• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the scientific reasons why salted peanuts are served with drinks in bars snk

मद्यपान करताना खारे शेंगदाणे का दिले जातात? काय आहे यामागील शास्त्रीय कारण…

मोफत शेंगदाणे: रेस्टॉरंटमध्ये अल्कोहोलसोबत मोफत खारवलेले शेंगदाणे सर्व्ह करण्यामागे अनेक मनोरंजक कारणे आहेत, ज्यांची बहुतेक लोकांना माहिती नसते. तुम्ही जेंव्हा रेस्टॉरंट किंवा बारमध्ये जाता तेंव्हा तुम्हाला अल्कोहोलसोबत खारवलेले शेंगदाणे मोफत मिळतात.

Updated: October 6, 2024 12:50 IST
Follow Us
  • Free Peanuts with Alcohol
    1/9

    मद्यपान करणे हे प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक आवड आणि निवड असली तरी पण मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहित आहे. मद्यपान करताना सहसा खारे शेंगदाणे किंवा मसालेदार स्नॅक्स दिले जातात.. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 2/9

     पण असे का केले जाते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का. मद्यपान आणि खारे दाणे हे कॉम्बिनेशन इतके प्रसिद्ध का आहे? आता घरातील पार्टीमध्येही लोक खारट शेंगदाणे आणि इतर चवदार स्नॅक्ससह ड्रिंक्सबरोबर देतात पण यामागील शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का? (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 3/9

    भारतातील पहिली आणि आतापर्यंत एकमेव मास्टर ऑफ वाईन सोनल हॉलंडने तिच्या इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी रेस्टॉरंट आणि बार फुकटात शेंगदाणे का देतात आणि त्यातून त्यांना काय फायदा होतो हे सांगितले आहे. (फोटो स्रोत: @sonalholland_masterofwine/instagram)

  • 4/9

    सोनलने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, शेंगदाणे खाल्ल्याने लवकर तहान लागते. शेंगदाण्यामध्ये मीठ असते जे पाणी शोषून घेते. अशा स्थितीत तुम्ही जेव्हाही शेंगदाणे खातात तेव्हा ते तोंडातून आणि घशातील आर्द्रता शोषून घेते आणि कोरडे करते. (फोटो स्रोत: @sonalholland_masterofwine/instagram)

  • 5/9

    कोरड्या घशामुळे तुम्हाला जास्त तहान लागते आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त मद्य सेवन करता. त्यामुळे रेस्टॉरंट आणि बारला खूप फायदा होतो कारण त्यांची दारू जास्त विकली जाते आणि त्यांना जास्त नफा मिळतो. (फोटो स्रोत: @sonalholland_masterofwine/instagram)

  • 6/9

    TOIच्या वृत्तानुसार, मीठामध्ये पाणी शोषून घेण्याची तीव्र प्रवृत्ती असते आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही खारट स्नॅक्स खाता तेव्हा ते तोंड आणि घशातील ओलावा शोषून तुमचे तोंड कोरडे करते आणि त्यामुळे तुम्हाला आणखी तहान लागते. तज्ञांच्या मते, मद्याबरोबर खारे दाणे देणे ही देखील बारची एक व्यावसायिक रणनीती आहे, कारण जेव्हा तुम्ही जास्त खारे दाणे खाता तेव्हा तुम्हाला जास्त तहान लागते आणि आपोआपच तुम्ही अधिक पेये ऑर्डर केले जाते आणि त्याचां फायदा होतो. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

  • 7/9

    खारे दाण्यांमुळे कडू मद्य पिणे होते सोपे
    मद्याची चव अनेकदा कडू असते आणि जेव्हा तुम्ही मीठ खाता तेव्हा मेंदूतील रिसेप्टर्स कडू चव तात्पुरती कमी होते आणि त्यामुळे कडू मद्य पिणे सोपे होते. जर तुम्ही निरीक्षण केले नसेल तर, पुढच्या वेळी तुम्ही प्याल तेव्हा काही खारट शेंगदाणे खाऊन पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की, कडू चवीचे मद्य पिणे अधिक सोपे आहे

    (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

  • 8/9

    मीठ आणि मद्य एकमेकांना पूरक आहेत
    मीठ आणि अल्कोहोल यांचे मिश्रण एकमेकांना पूरक असल्याचे आढळून आले आहे. (सौजन्य – फ्रिपीक)

  • 9/9

    तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मद्यपान करताना मिठाचे पदार्थांमुळे त्याची चव आणखी चांगली लागते. त्यामुळे तुम्ही अधिक खारे दाणे किंवा स्नॅक्स खाता आणि परिणामी आणखी मद्यपान करता. (सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
मद्यLiquorमराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: The scientific reasons why salted peanuts are served with drinks in bars snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.