-
मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, अनेकदा चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. फळे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी काही फळे अशी आहेत ज्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेही रुग्णांनी ही फळे सेवन करणे टाळले पाहिजे ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
-
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते पण हे फळ शरीरात साखरेची पातळी वाढवते. यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
-
केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरे प्रमाण अधिक असते मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात केळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
-
डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात पण यामध्ये अतिरिक्त साखर असलेल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी डाळिंबाचे सेवन टाळावे.
-
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी द्राक्षे खाने टाळावे.
-
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, परंतु त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखर मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक असू शकते.
-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी लिचीचे सेवन धोकादायक ठरू शकते यामधील नैसर्गिक साखरेचे प्रमाणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
-
चिकूच्या फळामध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे.
-
खजूरमध्ये भरपूर नैसर्गिक साखरेची पातळी अधिक असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी खजूरचे सेवन टाळावे. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
Healthy Living: मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहेत ‘ही’ फळे; शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सेवन टाळा
Healthy Living: काही फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते मधुमेहाच्या रुग्णांनी ही फळे खाने टाळावे.
Web Title: Healthy living these fruits can be dangerous for diabetic patients avoid consumption to control sugar levels in the body arg 02