• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is the new cookware healthier than non stick stainless steel what the experts say sap

नॉन-स्टिक, स्टेनलेस स्टीलच्या तुलनेत नवा कूकवेअर आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञ काय सांगतात..

Cookware: ट्रिपली कूकवेअरमध्ये तीन थर असल्याचा दावा करण्यात आला आहे; जे अन्नाचे पौष्टिक मूल्य अबाधित ठेवण्यास मदत करतात.

September 18, 2024 00:05 IST
Follow Us
  • new cookware healthier than non-stick, stainless steel
    1/9

    हल्ली बाजारात स्टेनलेस स्टीलपासून कास्ट आयर्न आणि नॉन-स्टिकपर्यंत विविध कूकवेअरचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    परंतु, आता यामध्ये आणखी एका नव्या पर्यायाचीदेखील भर पडली आहे. हा पर्याय त्या लोकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो निरोगी आणि सृदृढ आयुष्य जगण्याला प्राधान्य देतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    ट्रिपली कूकवेअरमध्ये तीन थर असल्याचा दावा करण्यात आला आहे; जे अन्नाचे पौष्टिक मूल्य अबाधित ठेवण्यास मदत करतात. कोटिंग्ज आणि रसायनमुक्त असल्यामुळे या कूकवेअरला त्याच्या काही समकक्षांपेक्षा डिशवॉशर अनुकूल असल्याचेदेखील मानले जाते.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    खरे तर, त्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, अनेक शेफ आणि दिग्गज लोक त्याची शिफारस करीत आहेत. म्हणून आपण सर्वांनी याचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात करावा का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे ठरवले.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    डॉ. भावना पी, मुख्य आहारतज्ज्ञ, ग्लेनेगल्स हॉस्पिटल, हैदराबाद यांनी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला सांगितले की, “ट्रिपली डायट कूकवेअर हे फूड-ग्रेड स्टेनलेस स्टीलचे दोन थर (बाह्य व आतील) आणि ॲल्युमिनियमचा एक थर (मध्यभागी) अशा तीन थरांनी बनवण्यात आलेला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    त्यांनी सांगितले, “याचे स्टेनलेस स्टीलचे थर अन्न आणि कूकवेअरमधील रासायनिक प्रतिक्रियांना प्रतिबंधित करतात आणि अन्नाची पौष्टिकता अबाधित ठेवतात.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    डॉ. भावना यांनी सांगितले, “हे कूकवेअर उष्णता समान रीतीने वितरित करण्यास मदत करते. त्यामुळे जळण्याची आणि असमान अन्न शिजविण्याची जोखीम कमी होते; ज्यामुळे पोषक तत्त्वांचा नाश होतो. या गुणवत्तेमुळे अन्नामधील अतिरिक्त तेलाची गरजदेखील कमी होते, त्यामुळे संतुलित आहार राखण्यास मदत होते. याव्यतिरिक्त ट्रिपली कूकवेअर टिकाऊ असते आणि बऱ्याचदा हानिकारक कोटिंग्जपासून मुक्त असते; जे कालांतराने खराब होऊ शकते.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    पुढे त्यांना सांगितले, “तसेच हे उष्णता टिकवून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.”(फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    डॉ. भावना यांनी सांगितले की, हे कूकवेअर जास्त गरम करणे टाळावे. “त्यामुळे स्टेनलेस स्टीलमधून निकेल आणि क्रोमियम या मिश्रधातूची कमी प्रमाणात गळती होऊ शकते.” पण, ट्रिपल डाएट कुकवेअर सिंगल-लेयर स्टेनलेस स्टील किंवा नॉन-स्टिक पॅनच्या तुलनेत अनेकदा महाग असते.(फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Is the new cookware healthier than non stick stainless steel what the experts say sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.