-
कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात आणि या पानांचा त्वचेसह अनेक समस्यांसाठी वापर केला जातो. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट त्वचेवरील मुरुम आणि खाज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय केसांसाठीही ते फायदेशीर आहे. एवढेच नाही तर डासांपासून दूर राहण्यासाठीही याचा वापर करू शकता. कडुलिंबाच्या पानांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.
-
कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात चंदन घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यावर चेहरा स्क्रब करून स्वच्छ करा. यामुळे मुरुमे कमी होण्यास मदत होते आणि चेहरा सुंदरही होतो.
-
केसांचा कोंडा कमी करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने वापरू शकता यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने बारीक करून डोक्याला लावू शकता.
-
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने वापरू शकता. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात थोडा कोरफड घाला आणि ते डागांवर लावा. हे मृत पेशी कमी करून चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते.
-
जर तुमच्या घरात खूप डास असतील तर तुम्ही कडुलिंबाची पाने जाळून ते घरात फिरवू शकता, या वासाने डास कमी होतात. ही पाने अँटीबॅक्टेरियल असतात आणि जे डासांना कमी करून त्यांना मारण्यास उपयोगी ठरते.
-
कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयोगी ठरतात. यामुळे धान्यावर किडांचा प्रादुर्भाव कमी होतो व धान्य दीर्घकाळ सुरक्षित राहतं.
-
कपड्यांमध्ये कडुलिंबाची पाने ठेवल्याने त्यातील कीटकांपासून संरक्षण होते आणि त्वचेवरील समस्या देखील दूर होतात.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(सर्व फोटो: फ्रीपीक)
Neem Leaves: त्वचेपासून ते डासांपासून रक्षणापर्यंतच्या ‘या’ समस्यांसाठी जाणून घ्या कडुलिंबाच्या पानांचा घरगुती उपाय
Neem Leaves: जाणून घ्या कडुलिंबाच्या पानांचे काही घरगुती उपाय.
Web Title: Neem leaves for skin problems to protection from mosquitoes know neem leaves home remedies arg 02