• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. benefits of pear fruit 5 reasons why you should include nashpati in your daily diet srk

Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं शरिराला मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

जर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक आणि स्वादिष्ट जोड शोधत असाल, तर पेर हे फळ आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करू शकते.

September 25, 2024 19:26 IST
Follow Us
  • why you should include nashpati in your daily diet
    1/9

    आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राखणे हे देखील महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आता काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेक जण सजग आहेत. या पार्श्वभूमीवर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय जेवावे हे माहीत असणेही गरजेचे आहे. (PHOTO: Freepik)

  • 2/9

    आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते; पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि स्वत:हून आरोग्याच्या समस्या अंगावर ओढवून घेतो.(PHOTO: Freepik)

  • 3/9

    तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही खाऊ शकता अशा सर्वात पौष्टिक फळांपैकी एक म्हणजे पेर फळ. पेर फळाला बोली भाषेमध्ये नाशपाती या नावानंही ओळखले जाते. जर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक आणि स्वादिष्ट जोड शोधत असाल, तर पेर हे फळ आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करू शकते.(PHOTO: Freepik)

  • 4/9

    जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात पेर फळाला का समाविष्ट करावे याचं एक मुख्य कारण म्हणजे, पेर या फळामध्ये फायबर असते, जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते. यूएस कृषी विभागाच्या मते, एका मोठ्या पेर फळामध्ये (२३० ग्रॅम) ७.१३ ग्रॅम फायबर असते. हे फायबर मल मऊ करण्यास मदत करते आणि नियमित मलविसर्जनास प्रोत्साहन देते.(PHOTO: Freepik)

  • 5/9

    पेर हे सर्वात जास्त पाणी असलेल्या फळांपैकी एक आहे? होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. USDA नुसार, पेरमध्ये ८४% पाणी असते, जे हायड्रेटेड राहण्यासाठी महत्त्वाचे आहे.(PHOTO: Freepik)

  • 6/9

    पेर हे फळ सहज पचण्याजोगे आहे, जे ॲसिड रिफ्लेक्स किंवा छातीत जळजळ यांसारख्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी ते योग्य ठरते. पेर फळ तुमच्या आतड्याला त्रास न देता शांत करण्यास मदत करू शकतात.(PHOTO: Freepik)

  • 7/9

    पेर फळाचे सेवन केल्याने जळजळ कमी करण्यासोबतच टाइप २ मधुमेह आणि स्ट्रोकसह प्रमुख आरोग्य समस्यांचा धोकाही कमी करू शकतात. शिवाय फायबर, हायड्रेशन, प्रीबायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट्सचे सेवन पेर या फळाला अष्टपैलू बनवते, त्यामुळे या फळाचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा आणि तुमची पचनसंस्था अधिक निरोगी करा.(PHOTO: Freepik)

  • 8/9

    आपले आतडे प्रभावीपणे स्वच्छ करणे खरोखर शक्य आहे; परंतु ते एक दिवसाचे काम नाही. त्यासाठी आपण रोज आतड्याची काळजी घेणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.(PHOTO: Freepik)

  • 9/9

    निरोगी जीवनशैलीमध्ये अतिरिक्त कॅलरीज कमी करण्यासाठी नियमित व्यायामाचाही समावेश करणे आवश्यक आहे. साखर आणि साखरयुक्त पेये टाळल्याने ऊर्जेची पातळी उच्च राहून, एकंदर आरोग्य चांगले राहते.(PHOTO: Freepik)

TOPICS
फूडFoodलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Benefits of pear fruit 5 reasons why you should include nashpati in your daily diet srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.