• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. surya grahan 2024 will is second solar eclipse seem in india know date and time ndj

Surya Grahan 2024 : या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? कधी आहे हे ग्रहण, जाणून घ्या वेळ अन् तारीख

Surya Grahan 2024 : सुर्यग्रहणाची वेळ आणि तारीख कोणती? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

September 26, 2024 12:25 IST
Follow Us
  • Surya Grahan 2024 Date and Time
    1/9

    हिंदू धर्मामध्ये ग्रहाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी चंद्र ग्रहणाबरोबर सूर्यग्रहण सुद्धा दिसून येते. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. (Photo : Social Media)

  • 2/9

    सूर्यमालेत सूर्य स्थिर असतो आणि इतर ग्रहांप्रमाणेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरतो. या दरम्यान अशी एक वेळ येते की चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. यामुळेच सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश काही वेळेसाठी खंडित होतो. याला सूर्यग्रहण म्हणतात. (Photo : Social Media)

  • 3/9

    या वर्षीचे पहिले सूर्य ग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी होते पण ते भारतात दिसले नाही. या ग्रहणाचा परिणाम राशिचक्रातील बारा राशींवर दिसून आला होता. आता या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात असून पितृपक्षाच्या अमावस्येला दिसून येईल. सुर्यग्रहणाची वेळ आणि तारीख कोणती? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Social Media)

  • 4/9

    कधी आहे या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण? (Solar Eclipse 2024 Date and Time)

    ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर २०२४ आहे. या दिवशी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी हे सूर्यग्रहण ग्रहण सुरू होणार असून जो रात्री ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होणार. या ग्रहणाचा कालावधी ६ तास ४ मिनिटांचा असणार. हिंदू पंचागनुसार, या वर्षी दुसरे सूर्यग्रहण आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथिला दिसून येईल. या दिवशी पितृपक्ष अमावस्या आहे. (Photo : Social Media)

  • 5/9

    या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

    या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी आहे त्यामुळे ते भारतात दिसणार नाही. (Photo : Social Media)

  • 6/9

    सूर्यग्रहण दरम्यान सूतक काळ पाळायचा का?

    हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सुतक कालावधी वैध राहणार नाही. सुतक कालावधीचे नियम पाळणे बंधनकारक असणार नाही. या कालावधीत मंदिरे किंवा कपाट बंद ठेवतात. या दरम्यान कोणतेही शुभ कार्य केली जात नाही. (Photo : Social Media)

  • 7/9

    या वर्षी कुठे दिसणार हे सूर्यग्रहण?

    दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसून येणार नाही पण त्या दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना फिजी, चिली, न्यूझीलंड, ब्राझील, मेक्सिको, पेरू आणि पॅसिफिक महासागराच्या उत्तरेकडील भागात दिसणार. (Photo : Social Media)

  • 8/9

    ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण कन्या राशी आणि हस्त नक्षत्रात दिसून येईल. तसेच याच दिवशी चंद्राबरोबर बुध आणि केतू विराजमान राहील. गुरू आणि मंगळाची पूर्ण दृष्टी दिसून येईल. सूर्याच्या दुसर्‍या स्थानावर शुक्र, सहाव्या स्थानावर वक्री शनि विराजमान राहणार. अशात काही राशींना लाभ मिळू शकतो. या सूर्य ग्रहणाचा मिथुन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि धन लाभ मिळू शकतो. अडकलेली कामे मार्गी लागतील. (Photo : Social Media)

  • 9/9

    याशिवाय मेष, वृषभ, सिंह, मीन राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना किंवा कोणत्याही यात्रेदरम्यान सतर्क राहा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. या दरम्यान या लोकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये नाही तर यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. (Photo : Social Media)

TOPICS
राशीवृत्तRashibhavishyaसूर्य ग्रहण २०२४Solar Eclipse 2024

Web Title: Surya grahan 2024 will is second solar eclipse seem in india know date and time ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.