• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is it really necessary to change the toothbrush from time to time what do health experts say sap

वेळोवेळी टूथब्रश बदलणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात..

Toothbrush Change: दर दोन-तीन महिन्यांनी टूथब्रश बदलण्याची शिफारस करतात. ही कालमर्यादा हे सुनिश्चित करते की, तुमचे दात स्वच्छ करण्यासाठी ब्रिस्टल्स प्रभावी राहतील.

September 26, 2024 22:10 IST
Follow Us
  • change the toothbrush from time to time
    1/9

    दररोज दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे ही आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली सवय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    परंतु, तुम्ही या कामासाठी योग्य साधन वापरत आहात का? तुमच्या टूथब्रशची परिणामकारकता त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    डॉ. करिश्मा अॅस्थेटिक्सच्या कॉस्मेटिक दंतचिकित्सक डॉ. निशा ठक्कर यांनी याबाबत सल्ला दिला आहे.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    डॉ. ठक्कर यांनी सांगितले की, दातांमधील प्लेक, तसेच तुमच्या दात आणि हिरड्या यांच्यामध्ये अडकलेले अन्नाचे कण, त्याज्य घटक बाहेर काढता येतील अशा रीतीने टूथब्रशच्या ब्रिस्टल्सची रचना केली गेलेली असते.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    परंतु जीर्ण झालेले ब्रिस्टल्स दातांची व्यवस्थित साफसफाई करू शकत नाहीत. मग त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होणे आणि हिरड्यांचे आजार आदी त्रास उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    डॉ. ठक्कर सामान्य नियमानुसार, दर दोन-तीन महिन्यांनी टूथब्रश बदलण्याची शिफारस करतात. ही कालमर्यादा हे सुनिश्चित करते की, तुमचे दात स्वच्छ करण्यासाठी ब्रिस्टल्स प्रभावी राहतील.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    दोन-तीन महिन्यांपूर्वीच तुमचा टूथब्रश तुटला किंवा ब्रिस्टल्स वाकलेले दिसू लागल्यास लगेच नवीन टूथब्रश वापरण्यास सुरुवात करा, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    आजारपणातून बरे झाल्यानंतर जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डॉ. ठक्कर तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना टूथब्रश बदलण्याचा सल्ला देतात. असे केल्या पुन्हा संसर्ग टाळण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    ताजे ब्रिस्टल्स प्लेक, अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी चांगले असतात; ज्यामुळे तोंड स्वच्छ आणि निरोगी होते. तसेच दातांमधील प्लेक काढून टाकल्याने दातांमध्ये पोकळी तयार होणे आणि हिरड्यांचे रोग होण्याला प्रतिबंध होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Is it really necessary to change the toothbrush from time to time what do health experts say sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.