• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. expert tips to get rid of head lice sap

केसातील उवा दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय..

Head lice Tips: अनेक जण विविध तेल, शॅम्पू, औषधांचा वापर करून, उवांचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु, उवा घालविण्यासाठी करण्यात येणारे उपाय सावधगिरीचे करावेत, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जाते.

Updated: October 6, 2024 20:19 IST
Follow Us
  • Expert tips to get rid of head lice
    1/10

    मोठे केस असलेल्या अनेक महिलांना केसातील उवांचा सामना करावा लागतो. डोक्यातील उवा शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात असू शकतात; परंतु याचा दुष्परिणाम प्रौढांवरदेखील होऊ शकतो. उवा केसांच्या त्वचेवर अंडी घालतात; ज्यामुळे त्यांचा संसर्ग वाढत जातो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/10

    अनेक जण विविध तेल, शॅम्पू, औषधांचा वापर करून, उवांचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु, उवा घालविण्यासाठी करण्यात येणारे उपाय सावधगिरीचे करावेत, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जाते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/10

    म्हणून आम्ही याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कॉस्मेटिक स्किन ॲण्ड होमिओ क्लिनिकमधील सौंदर्यशास्त्रीय चिकित्सक व कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. करुणा मल्होत्रा, डॉ. रिंकी कपूर, एक सल्लागार त्वचाविज्ञानी, कॉस्मेटिक त्वचाविज्ञानी व त्वचारोगतज्ज्ञ, मुंबई येथील त्वचाविकार तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधला. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/10

    “उवांचा प्रादुर्भाव उबदार हवामानात सर्वांत जास्त होतो; विशेषत: उन्हाळ्याच्या शेवटी आणि शरद ऋतूच्या सुरुवातीला जेव्हा मुलांची शाळा सुरू होते. कारण- या काळात मुलांचा शाळा, क्लासेस, वर्ग अशा सामाजिक वातावरणाशी जवळचा संपर्क येतो. तथापि, वर्षाच्या कोणत्याही वेळी उवा होऊ शकतात,” असे डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/10

    त्यांनी सांगितले, “उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात उवा जास्त प्रमाणात आढळतात. कारण- वाढलेली आर्द्रता आणि जवळच्या शारीरिक परस्परसंवादामुळे त्यांचा अधिक सहजपणे प्रसार होतो.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/10

    डॉ. कपूर म्हणाल्या, “उवा सहसा आकाराने लहान असतात आणि त्या तिळासारख्या दिसू शकतात. तसेच, त्यांचा रंग राखाडी किंवा तपकिरी रंगाचा असतो. उवा एक प्रकारचे परजीवी कीटक आहेत; जे मुख्यतः टाळू आणि केसांवर आढळतात. उवा केसांत असल्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू शकते. प्रौढ, तसेच मुलांमध्ये ही एक सामान्य स्थिती आहे. वरती हे वाक्य आलेय. पुन्हा का,” डॉ. कपूर म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/10

    उवांच्या प्रादुर्भावामुळे विविध लक्षणे दिसू शकतात; ज्यात टाळूची आग होते किंवा खाज सुटते. हे त्यातील सर्वांत सामान्य लक्षण आहे; जे उवा चावल्यामुळे ॲलर्जी होते. “कोणत्याही उघड कारणाशिवाय तुमचे केस आणि टाळू खाजवण्याची गरज तुम्हाला वारंवार वाटत असेल, तर ते उवांच्या प्रादुर्भावाचे कारण असू शकते,” असे डॉ. कपूर म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/10

    उवा स्वतः किंवा त्यांची अंडी कधी कधी टाळू किंवा केसांवर दिसू शकतात. सतत टाळू खाजल्याने लहान लाल फोड होऊ शकतात; जे संक्रमित होऊ शकतात. उवांमुळे अस्वस्थता वाढते. मुलांमध्ये ही अस्वस्थता जास्त प्रमाणात पाहायला मिळते. असे डॉ. मल्होत्रा म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/10

    डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या, “उवा प्रामुख्याने सतत एखाद्या व्यक्तीच्या जास्त संपर्कातून किंवा इतरांची टोपी, कंगवा व हेअरब्रश यांसारख्या वैयक्तिक वस्तू वापरल्यास होतात. तसेच शाळेतील मुली दररोज एकमेकींच्या संपर्कात असतात, शेजारी बसतात, खेळताना डोक्याला डोके लावतात. त्यामुळे संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. अस्वच्छतेमुळे डोक्यातील उवा होत नाहीत. त्या थेट संपर्काद्वारे पसरतात आणि स्वच्छतेची पर्वा न करता, कोणालाही प्रभावित करू शकतात.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 10/10

    केसांमधून उवा आणि अंडी काढण्यासाठी बारीक दात असलेल्या उवांचा कंगवा वापरा. हे सहसा औषधी उपचारांच्या संयोगाने वापरले जाते. काही लोक तेल वापरतात (उदा. चहाच्या झाडाचे तेल किंवा खोबरेल तेल); जे औषधोपचारांपेक्षा कमी विश्वासार्ह असते. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Expert tips to get rid of head lice sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.