• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the many benefits and some drawbacks of adding cinnamon powder to curd snk

दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करावे का? जाणून घ्या त्याचे अनेक फायदे आणि काही तोटे

Cinnamon and curd : दालचिनी पावडर दह्यात मिसळणे हे एक स्वादिष्ट आणि फायदेशीर पदार्थ असू शकते

October 14, 2024 11:24 IST
Follow Us
  •  The many benefits and some drawbacks of adding cinnamon powder to curd
    1/10

    दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात; विशेषत: महिलांसाठी. तज्ज्ञ सांगतात, “दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत, जे हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करतात. तसेच, दालचिनीमधील वाईट जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म दह्याच्या सुखदायक प्रभावांसह एकत्रितपणे त्वचेचा संपूर्ण पोत सुधारण्यास मदत करू शकतो. परंतु, हे कार्य कसे घडते हे समजून घेणे आणि त्याप्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे,” असे मनप्रीत कौर पॉल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. कौर या फरीदाबाद क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये कार्यकारी पोषणतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

  • 2/10

    दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करण्याचे फायदे (Benefits of cinnamon and curd)
    रक्तशर्करेवर नियंत्रण : मधुमेह असलेल्या किंवा मधुमेह होण्याचा धोका असलेल्या स्त्रियांसाठी दही आणि दालचिनीचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. “दालचिनी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते आणि दह्यातील प्रो-बायोटिक्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात,” असे मनप्रीत यांनी सांगितले.

  • 3/10

    इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा : स्त्रियांसाठी, विशेषत: ज्यांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)चा त्रास आहे, त्यांना इन्सुलिन संवेदनशीलता सुधारणे अत्यावश्यक आहे. दालचिनी इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्यात मदत करू शकते; ज्यामुळे पीसीओएसची लक्षणे नियंत्रित करण्यात आणि मासिक पाळीचे नियमन करण्यात मदत होऊ शकते.

  • 4/10

    दाहकताविरोधी गुणधर्म : दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्यास बऱ्याच काळापासून दाहकतेचा त्रास होत असेल तर पीसीओएस सारख्या परिस्थितींमध्ये कारणीभूत ठरणाऱ्या हार्मोनल कार्याच अडथळा आणू शकते आणि मासिक पाळीचे नियमन करण्यास देखील मदत करते. “दालचिनीमध्ये दाहकताविरोधी गुणधर्म आहेत, जे दाहकता कमी करण्यास आणि संपूर्ण हार्मोनल आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात,” असे मनप्रीत यांनी सांगितले.

  • 5/10

    अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म :दालचिनीमध्ये पॉलिफेनॉलसारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवू शकतात. ऑक्सिडेटिव्ह ताण हार्मोनच्या उत्पादन आणि संतुलनावर नकारात्मक परिणाम करू शकतो. पण, संयम महत्त्वाचा आहे आणि तुमच्या वैयक्तिक आरोग्याच्या गरजांसाठी ते योग्य आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम आहे, असे मनप्रीत यांनी स्पष्ट केले.

  • 6/10

    दालचिनी पावडर दह्यात मिसळणे हे एक स्वादिष्ट आणि फायदेशीर असू शकते. दही प्रो-बायोटिक्स देत, जे आतड्यांच्या आरोग्यास सहकार्य करते आणि योग्य हार्मोनल नियमनासाठी आतड्यांचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

  • 7/10

    दही-दालचिनी तयार करण्याच्या दोन पाककृती खालीलप्रमाणे :
    चविष्ट दही-दालचिनी कृती
    साहित्य
    १ कप साधे दही (दही)
    १/२ टीस्पून दालचिनी (दालचिनी) पावडर
    पर्यायी : गोडपणासाठी मध किंवा ताजी फळे वापरू शकता.
    पद्धत
    दालचिनी पावडर दह्यामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत मिसळा.
    हवे असल्यास त्यात मध किंवा ताजी फळे घाला.
    स्नॅक किंवा नाश्त्याचा भाग म्हणून या आहाराचे सेवन करा.

  • 8/10

    दही-दालचिनी स्मूदी
    साहित्य
    १ कप दही
    १ सफरचंद (कापलेले)
    १ टीस्पून दालचिनी
    १ टीस्पून मध
    पद्धत
    कापलेले सफरचंद, दही, दालचिनी पावडर व मध ब्लेंडरमध्ये घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.
    स्मूदी एका ग्लासमध्ये घाला आणि नाश्ता किंवा संध्याकाळच्या ताज्या आहाराचा भाग म्हणून तुमच्या समृद्ध, स्वादिष्ट स्मूदीचा आनंद घ्या.

  • 9/10

    दह्यात दालचिनी टाकून सेवन करण्यापूर्वी सावधगिरीच्या सूचना (Precautionary notes before consuming cinnamon in yogurt)
    संयम : अतिप्रमाणात दालचिनीचे सेवन केल्याने त्यात असलेल्या कूमरिनमुळे (coumarin) आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कूमरिनचे जास्त प्रमाणात सेवन विषारी ठरू शकते. त्यामुळे दालचिनीचे साधारणपणे दररोज अर्धा ते एक चमचा या शिफारस केलेल्या प्रमाणातच सेवन करा, असे मनप्रीत म्हणाले.

  • 10/10

    अ‍ॅलर्जी : तुम्हाला दालचिनी किंवा दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी नाही ना याची खात्री करून घ्या.
    वैद्यकीय परिस्थिती : तुमची कोणतीही वैद्यकीय स्थिती असल्यास किंवा औषधोपचार सुरू असल्यास, तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण- ते तुमच्याशी काही औषधे आणि अटींबाबत संवाद साधू शकतात. “मधुमेह असलेल्या स्त्रियांनी रक्तातील साखरेच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. कारण- काही असे वेळा दालचिनी विशिष्ट औषधांसह रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते,” मनप्रीत यांनी सांगितले.

TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoमराठी बातम्याMarathi Newsव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: The many benefits and some drawbacks of adding cinnamon powder to curd snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.