-
भाज्या चिरणे, फळे कापणे यासाठी सध्या चॉपिंग बोर्डचा उपयोग केला जातो. पण, स्वयंपाकघरातील हेच चॉपिंग बोर्ड म्हणजे बॅक्टेरिया वाढविण्याला खतपाणी घालणारं एक ठिकाण आहे. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
चॉपिंग बोर्ड टॉयलेट सीटपेक्षा जास्त अस्वच्छ असू शकतो, असं सोशल मीडियावर काही जण म्हणतात. तर हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने याबद्दल तज्ज्ञांशी चर्चा केली. तसेच याबद्दल समजून घेतलं की, नक्की हे खरं आहे का… (फोटो सौजन्य : @Freepik )
-
नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख व आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांच्या मते, चॉपिंग बोर्ड हा कच्च्या मांस, भाज्यांच्या संपर्कात आल्याने त्यावर ई. कॉईल व साल्मोनेला यांसारखे हानिकारक जीवाणू असू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
चॉपिंग बोर्डची तुलना टॉयलेट सीटशी करणं थोडं जास्त विचित्र वाटत असलं तरी तज्ज्ञांनी सांगितलं की, विशेषतः लाकडी चॉपिंग बोर्ड योग्य प्रकारे स्वच्छ केला न गेल्यास ती जागा बॅक्टेरियाच्या वाढीला आमंत्रण देणारी ठरू शकते. लाकडाची छिद्रे असणारी संरचनेत बॅक्टेरिया प्रवेश करतात आणि मग ते त्यातल्या गडद व खडबडीत जागांमध्ये वाढू शकतात. त्यामुळे चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवणं खूप आवश्यक आहे; जेणेकरून आपल्या आरोग्याच्या समस्या कमी होतील. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
या चर्चेत आहारlज्ज्ञ व मधुमेह शिक्षिका कनिका मल्होत्रा यांनी मत मांडलं की, मायक्रोबायोलॉजिस्ट (सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ) चार्ल्स गेर्बाच्या यांच्या संशोधनानुसार, चॉपिंग बोर्डावर टॉयलेट सीटपेक्षा अधिक प्रमाणात जीवाणू असू शकतात. आपण जेव्हा चॉपिंग बोर्ड योग्य रीतीनं स्वच्छ करीत नाही, तेव्हा ते जीवाणू आपल्या हातांवर किंवा स्वयंपाकाच्या इतर साधनांवर पसरू शकतात. असे घडते; कारण- चॉपिंग बोर्ड अनेकदा कच्च्या मांसाच्या संपर्कात येतो आणि त्याच्या पृष्ठभागावर जीवाणू अडकून राहू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
चला तर मग, चॉपिंग बोर्ड कसा स्वच्छ करायचा ते जाणून घेऊ.( (फोटो सौजन्य : @Freepik )
-
१. आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षिका कनिका मल्होत्रा यांनी चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवण्याकरिता कच्चे मांस आणि भाज्यांसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसे केल्याने सरमिसळ दूषितीकरण (क्रॉस-कंटॅमिनेशन) टाळण्यास मदत मिळेल. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
२. तुम्ही कधी कधी पातळ ब्लिच सोल्युशनने बोर्ड स्वच्छ करू शकता. पण, त्यासाठी चॉपिंग बोर्ड पूर्णपणे वाळवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण- कारण ओलावा बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करतो किंवा तुम्ही वापरून झाल्यानंतर चॉपिंग बोर्ड गरम पाणी आणि साबण (dish soap) ने सुद्धा धुवू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
३. जंतुनाशक पदार्थांचा वापर करून, चॉपिंग बोर्ड अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे आवश्यक आहे. साधे नैसर्गिक क्लीनर्स जसे की, मीठ किंवा लिंबूमुळे बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकण्यास मदत मिळेल. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
४. कालांतराने जेव्हा चॉपिंग बोर्डवर खूप खोल खडबडीत जागा तयार होतात, तेव्हा चॉपिंग बोर्ड बदलायला हवा. कारण- अशा जागांमध्ये बॅक्टेरिया लपून राहू शकतात; ज्यामुळे आरोग्याचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य : @Freepik )
लाकडी चॉपिंग बोर्ड कसा स्वछ करायचा? तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ चार टिप्स
How to clean your chopping board : लाकडी चॉपिंग बोर्ड योग्य प्रकारे स्वच्छ केला न गेल्यास ती जागा बॅक्टेरियाच्या वाढीला आमंत्रण देणारी ठरू शकते…
Web Title: How to properly clean your chopping board first use hot water and dish soap immediately after use asp