• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. can it be dangerous to use raw garlic to remove acne know the opinion of experts sap

मुरूम दूर करण्यासाठी कच्चा लसूण वापरणे ठरू शकतो घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

Raw Garlic For Acne: लसणामध्ये दाहकविरोधी प्रभावी संयुगेदेखील असतात, जे मुरूमांशी संबंधित लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतात.

Updated: October 22, 2024 18:06 IST
Follow Us
  • Raw Garlic For Acne
    1/10

    सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड खूप चर्चेत आला आहे, ज्यात ब्युटी इन्फ्लूएंसर्स आपल्या चेहऱ्यावर लसूण चोळताना दिसत आहे. त्यांच्या मते, चेहऱ्यावरील मुरूम साफ करण्यास, डाग कमी करण्यास आणि त्वचेचा रंग उजळण्यास लसूण खूप फायदेशीर ठरू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/10

    “मुरूमांसाठी कच्चा लसूण” हा शब्द आणि या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यात अनेकांना याचा फायदादेखील झालेला आहे. लसूण बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो, परंतु त्याचा थेट त्वचेवर वापर करणे धोकादायक ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/10

    याबाबत योग्य माहिती मिळवण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.श्वेता श्रीधर यांचा सल्ला घेतला. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/10

    ज्यात त्या म्हणाल्या की, “लसणाला त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे फार पूर्वीपासून ओळखले जाते. त्याच्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट या गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर लसूण चोळण्याचा ट्रेंड वाढला आहे.”(फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/10

    लसणातील एलिसिनला प्रयोगशाळेच्या अभ्यासात एक प्रभावी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ दर्शविला आहे. हे प्रोपिओनिबॅक्टेरियम मुरूमांविरुद्ध लढते, मुरूमांमध्ये गुंतलेले बॅक्टेरिया काढण्यास फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/10

    लसणामध्ये दाहकविरोधी प्रभावी संयुगेदेखील असतात, जे मुरूमांशी संबंधित लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/10

    लसणातील अँटिऑक्सिडंट सामग्री पेशींना नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करून निरोगी त्वचेसाठी योगदान देऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/10

    डॉ. श्वेता श्रीधर सांगतात की, लसणाचा उपाय खूप आकर्षक वाटत असला तरीही तो वापरताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. “तुमच्या चेहऱ्यावर कच्चा लसूण चोळणे हा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला मुरूमांचा उपचार नाही, जरी त्याचा अनेकांना फायदा होत असला तरीही. लसणाच्या दुष्परिणामांचा धोका फायद्यांपेक्षा जास्त आहे.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/10

    डॉ. श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, “कच्चा लसूण अत्यंत प्रभावी आहे, यामुळे त्वचेची जळजळ, लालसरपणा निर्माण होऊ शकतो. विशेषत: संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी याचा जास्त धोका निर्माण होतो. त्यात एंजाइम आणि सल्फर घटक असतात, ज्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 10/10

    याव्यतिरिक्त काही व्यक्तींना लसणाची ॲलर्जी असल्यास पुरळ, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी आणि तीव्र खाज यांसह ॲलर्जिक प्रतिक्रियांचा अनुभव येऊ शकतो, “लसणाच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असूनही, त्याच्या कठोर गुणधर्मामुळे त्वचेचा नैसर्गिक अडथळा विस्कळीत होऊ शकतो, संभाव्यत: जळजळ वाढू शकते आणि मुरूमांचा त्रास वाढू शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Can it be dangerous to use raw garlic to remove acne know the opinion of experts sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.