-
जगभरातील लोकांच्या दैनंदिन आहारात तांदूळ हा अविभाज्य घटक आहे. तांदळाचे त्याच्या किमतींनुसार असंख्य प्रकार आहेत. प्रत्येक तांदळाची स्वतःची अशी वेगळी चव, रंग आणि पोषक घटकही आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यापैकी राजामुडी तांदूळ हा मूळचा कर्नाटकमध्ये पिकविला जाणारा लाल तांदूळ आहे, जो त्याच्या संभाव्य आरोग्यदायी फायदे आणि अद्वितीय चव यांसाठी ओळखला जातो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आहार तज्ज्ञ व पोषण तज्ज्ञ डॉ. ट्विन्सी ॲन सुनील यांनी सांगितले, “राजामुडी तांदळाचे विशिष्ट पौष्टिक फायदे आहेत. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत राजामुडीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि या कारणास्तव तो मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. त्याव्यतिरिक्त ते उच्च फायबर आणि प्रथिनांमध्ये वाढ करते; जे ग्लुटेन असहिष्णुता असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
पांढऱ्या तांदळात कमीत कमी फायबर असते आणि लाल तांदळात ते मध्यम प्रमाणात असते. परंतु, राजामुडी तांदूळ या दोघांनाही मागे टाकतो आणि पचनशक्ती वाढवतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पांढरे तांदूळ कमीत कमी प्रथिने पुरवतो; परंतु यात प्रोटीन अधिक असते. लाल तांदूळ थोडासा सुधारतो. राजामुडी तांदूळ दोन्हींपेक्षा चांगला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पांढऱ्या तांदळात उच्च GI असतो; ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढते. तर, लाल तांदळात मध्यम स्वरूपाचा GI असतो. राजामुडीमध्ये या दोन्ही तांदळांच्या तुलनेत कमी GI आहे; जो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
राजामुडी तांदूळ स्वयंपाक करण्यापूर्वी भिजविल्याने त्याचा फायदा होतो . “३० मिनिटे ते तासभर भिजवून ठेवल्याने त्याची चव आणि सुगंध वाढतो,” डॉ. ट्विन्सी म्हणतात. ही प्रक्रिया काही स्टार्च तोडण्यास मदत करते; ज्यामुळे काही लोकांची पचनशक्ती सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
राजामुडी तांदूळ प्रामुख्याने कर्नाटकात पिकविला जाणारा तांदूळ आहे आणि पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत त्याची किंमत जास्त आहे. तथापि, डॉ. ट्विन्सी सांगतात, “त्याचे उत्कृष्ट पोषण आणि अद्वितीय चव, गुणधर्मांमुळे किमतीत किंचित वाढीची झळ सोसावी लागली तरी तो फायदेशीर ठरतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
राजमुडी तांदूळ पांढऱ्या आणि लाल तांदळाला पौष्टिक आणि चवदार पर्याय ठरू शकतो. उच्च फायबर व प्रथिन सामग्री, कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि वेगळ्या चवीसह अनेकांसाठी एक निरोगी पर्याय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
लाल आणि पांढऱ्या तांदळापेक्षा राजामुडी तांदूळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? तज्ज्ञांचे मत काय…
Rajamudi Rice: राजामुडी तांदूळ हा मूळचा कर्नाटकमध्ये पिकविला जाणारा लाल तांदूळ आहे, जो त्याच्या संभाव्य आरोग्यदायी फायदे आणि अद्वितीय चव यांसाठी ओळखला जातो.
Web Title: Ajamudi rice more beneficial for health than red and white rice what do the experts thin sap