-
बाजारातून मिठाई खरेदी करण्याकडेही अनेक जण पसंती देतात. सणासुदीच्या दिवसांत अनेक घरांमध्ये घरच्या घरी विविध पदार्थ बनवले जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मिठाईतील साखर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यासाठी साखरेला पर्याय असलेल्या काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे मिठाई खाऊन तुमचे आरोग्यही चांगले राहील. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सणासुदीला घरी पाहुण्यांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत अनेक लोक असे घरी येतात; जे डाएटमुळे साखरेचे पदार्थ खात नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही साखरेऐवजी खालील काही पर्याय वापरू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. तसेच तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे गुळाचा वापर तुम्ही मिठाई बनविण्यासाठी करू शकता. शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरात गुळाचा वापर केला जात आहे, जो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
वास्तविक गुळात अनेक प्रकारची खनिजे आणि पोषक घटक असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मिठाई बनविताना साखरेऐवजी मधाचा वापर करू शकता. हादेखील एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. त्यामध्ये कॅल्शियम, पोटेशियम, कॉपर, मँगनीज, झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मिठाईमध्ये टाकण्यासाठी कोकोनट शुगर हा एक चांगला पर्याय आहे. त्याला नैसर्गिक स्वीटनर, असेही म्हणतात; जे नारळाच्या झाडातून बाहेर पडणारे द्रव एकत्र करून तयार केले जाते. नेहमीच्या साखरेच्या तुलनेत नैसर्गिक स्वीटनरमुळे रक्तशर्करा कमी प्रमाणात वाढते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज