-
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी जवळपास एका राशीत अडीच वर्षे राहतो. शनीला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल ३० वर्षांचा काळ लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून, २९ जूनपासून शनी याच राशीत वक्री झाला आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच आता तो येत्या १५ नोव्हेंबर रोजी कुंभ राशीतील वक्री अवस्थेतून बाहेर येणार आहे. शनीची मार्गी अवस्था काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी मानली जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच यामुळे शश राजयोगाचा प्रभावही अधिक वाढतो. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. शनीची मार्गी अवस्था काही राशींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे हे गोचर भाग्यदायी ठरेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळवाल आणि कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे हे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात सर्व समस्यांपासून सुटका होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही शनीचे गोचर सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळवणार प्रेम, पैसा अन् प्रतिष्ठा; १५ नोव्हेंबरपासून मार्गी शनी चमकवणार भाग्य
Shani Mragi 2024: १५ नोव्हेंबर रोजी कुंभ राशीतील वक्री अवस्थेतून बाहेर येणार आहे. शनीची मार्गी अवस्था काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी मानली जाते.
Web Title: Shani mragi 24 three zodiac signs will get love money and prestige sap