• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is the right time for breakfast for health read expert opinion sap

आरोग्यासाठी नाश्त्याची योग्य वेळ कोणती? वाचा तज्ज्ञांचे मत…

Breakfast Timing: सकाळी ८ ते १० ही नाश्ता करण्याची उत्तम वेळ मानली जाते; जेव्हा अनेकांचे शरीर उर्जा वाढवण्यासाठी काम करते. परंतु, जे लोक अधूनमधून उपवास करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

November 5, 2024 12:53 IST
Follow Us
  • What is the right time for breakfast for health
    1/9

    निरोगी आरोग्यासाठी असं म्हटलं जातं, “सकाळचा नाश्ता राजासारखा करावा, दुपारचं जेवण राजकुमारासारखं आणि रात्रीचं जेवण गरिबासारखं करावं.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापेक्षा सकाळचा नाश्ता खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे. पौष्टिक नाश्ता हा केवळ शरीराच्या शक्तीसाठीच आवश्यक नाही, तर तो शरीराच्या कार्यांचे नियमन करण्यासदेखील मदत करतो. आपण आजपर्यंत सकाळचा नाश्ता ८ ते १० या वेळेत व्हायला हवा, असे ऐकले असेल. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    पण आता डिजिटल क्रिएटर डॉ. स्टीव्हन गुंड्री यांनी त्यांच्या एका पॉडकास्ट एपिसोडमध्ये सांगितले की, सकाळी १० किंवा ११ पर्यंत न्याहारी करण्याने आश्चर्यकारक गोष्टी करू शकतात. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता यादरम्यान जितका जास्त वेळ घेता, तितकी तुमची चयापचय लवचिकता, माइटोकाँड्रियल फंक्शन वाढेल आणि त्यामुळे तुमचे आयुष्यही वाढवता येईल.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील सल्लागार व आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम यांनी स्पष्ट केले, “अधूनमधून उपवासाचा भाग म्हणून नाश्त्याला उशीर केल्यानं विशिष्ट आरोग्य फायदे होऊ शकतात.” त्यांनी नमूद केले की, सकाळी १०-११ पर्यंत नाश्ता पुढे ढकलल्याने चरबी जाळण्यास प्रोत्साहन मिळू शकते आणि रात्रभर उपवासाचा कालावधी वाढवून इन्सुलिन संवेदनशीलता सुधारता येऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    त्यामुळे शरीर संचयित ऊर्जेवर अवलंबून राहू शकते. तथापि त्यांनी, “व्यक्तीचे वेळापत्रक, जीवनशैली व चयापचय क्षमता यांनुसार नाश्त्याची वेळ बदलते,” असेही सांगितले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    त्यावर सहमती दर्शवीत फोर्टिस हॉस्पिटल, सीजी रोड, बेंगळुरू येथील मुख्य आहार तज्ज्ञ रिंकी कुमारी म्हणाल्या, “नाश्ता एक ते दोन तासांनी पुढे ढकलल्याने फायदे होऊ शकतात. ही वेळ-प्रतिबंधित खाण्याची पद्धत ‘ऑटोफॅजी’ सुधारू शकते, चयापचय वाढवू शकते व चरबी जाळण्याची क्षमता वाढवू शकते.” त्यांनी असेही सांगितले की, नाश्ता उशिरा केल्याने एकूण कॅलरीज कमी होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    “सकाळी ८ ते १० ही नाश्ता करण्याची उत्तम वेळ मानली जाते; जेव्हा अनेकांचे शरीर उर्जा वाढवण्यासाठी काम करते. परंतु, जे लोक अधूनमधून उपवास करतात, ते सकाळी १०-११ वाजेपर्यंत नाश्ता करू शकतात. त्यामुळे त्यांना वजन नियंत्रित ठेवण्यास, तसेच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत मिळते,” असे कदम म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    “नाश्त्यासाठी योग्य अशी वेळ नाही. जीवनशैली, वेळापत्रक व वैयक्तिक प्राधान्यक्रम यांसारखे घटक नाश्त्याच्या सर्वोत्तम वेळेवर परिणाम करतात. काही अभ्यासांतून असे सुचवण्यात आले आहे की, उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करा; तर काही उशिरा खाण्याचा सल्ला देतात. अशा वेळी तुमच्या शरीराचे ऐका आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे ते शोधण्यासाठी प्रयोग करा,” असे कुमारी म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    आहारतज्ज्ञ कदम यांनी सांगितले केले की, नाश्त्यासाठी वेळ खरोखरच महत्त्वाची असली तरी तुम्ही काय खाता तेही महत्त्वाचे आहे. “पोषक घटकांनी युक्त संपूर्ण धान्य, प्रथिने व फायबर असलेले अन्न रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि एकाग्रता व मूड चांगला ठेवण्यास मदत करतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य: Freepik)

;

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: What is the right time for breakfast for health read expert opinion sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.