• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why childrens day is celelbrated on 14 november history importance and significance snk

Children’s Day 2024: दरवर्षी १४ नोव्हेंबरला का साजरा केला जातो बालदिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांनी मुलांचे आणि तरुणांचे हक्क आणि शिक्षण यासाठी काम केले.

Updated: November 14, 2024 11:42 IST
Follow Us
  • Why childrens day is celelbrated on 14 november history importance and significance
    1/9

    बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी आला आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते, मुलेही नेहरूजींना चाचा नेहरू म्हणत असत. चाचा नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

  • 2/9

    भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो?
    बालदिन हा १९५६ पासून २० नोव्हेंबर रोजी ‘युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनुषंगाने साजरा करण्यात येत होता पण भारतात ७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्याच वर्षी संसदेत १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याची एकमताने घोषणा करण्यात आली, तेव्हापासून बालदिन १४ नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जात आहे.

  • 3/9

    पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांनी मुलांचे आणि तरुणांचे हक्क आणि शिक्षण यासाठी काम केले. चाचा नेहरूंचे मुलांवरचे प्रेम आणि मुलांचे चाचा नेहरु यांच्यावर असलेले प्रेम यामुळे १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

  • 4/9

    जवाहरलाल नेहरूंचे मुलांच्या शिक्षणात योगदान
    जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी खूप योगदान दिले.

  • 5/9

    शिक्षण क्षेत्रात त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. जवाहरलाल नेहरू नेहमीच मुलांच्या शिक्षणाबाबत जनजागृती करत असे.

  • 6/9

    बालदिनाचे महत्त्व आणि इतिहास
    पंतप्रधान या नात्याने नेहरूंना देशात असे वातावरण निर्माण करायचे होते जिथे मुलांवर आणि त्यांच्या कल्याणाकडे लक्ष दिले जाईल. त्यांनी १९५५ मध्ये चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाची स्थापना केली जेणेकरून भारतीय मुलांना त्यांचे प्रतिनिधित्व पाहता येईल.

  • 7/9

    पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर, त्यांची जयंती ही भारतातील बालदिनाची तारीख म्हणून निवडली गेली.

  • 8/9

    कसा साजरा केला जातो बालदिन
    बालदिवसाच्या निमित्ताने देशभरात शाळांमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, खेळांचे आयोजन केले जाते. शाळेमध्ये वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या जाता.

  • 9/9

    अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू आणि खाऊ सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.

TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoमराठी बातम्याMarathi Newsव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: Why childrens day is celelbrated on 14 november history importance and significance snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.