• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mosquitoes are growing in the house this simple remedy of banana peel will kill mosquitoes sap

केळीच्या सालीचा ‘या’ उपायाने डासांचा होईल नायनाट

Banana hack for mosquito: आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत, जो घरातील डासांना घालवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

November 20, 2024 00:45 IST
Follow Us
  • his simple remedy of banana peel will kill mosquitoes
    1/9

    आता हिवाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसांत डासांची दहशतही मोठ्या प्रमाणात वाढते. संध्याकाळी घरचे दरवाजे, खिडक्या उघड्या राहिल्यामुळे डास घरात शिरतात आणि हे रात्री झोपल्यानंतर तुम्हाला त्रास देऊ लागतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    डासांमुळे रात्री शांत झोप न मिळाल्याने दुसरा दिवसही चांगला जात नाही, ज्याचा परिणाम तुमच्या कामावरही होऊ लागतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    इतकेच नाही तर डास चावल्यामुळे डेंग्यूचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत डासांना घरातून पळवून लावण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत, जो घरातील डासांना घालवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    विशेषत: तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि अशा परिस्थितीत तुम्ही डासांना दूर करण्यासाठी धोकादायक रसायने असलेली कॉइल वापरू शकत नसाल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    डास दूर करण्यासाठी तुम्ही केळीचे साल वापरू शकता. केळीच्या सालीतून येणारा तीव्र वास डासांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    यासाठी खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात केळीची साले ठेवू शकता. कोपऱ्यात डास जास्त दिसतात. अशा परिस्थितीत ही युक्ती डासांपासून दूर राहण्यास फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    जर डास जास्त असतील तर केळीची साल जाळून दिवसातून एक किंवा दोनदा घरात फिरवू शकता. त्यातून निघणारा धूर आणि उग्र वासदेखील डासांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    याशिवाय मिक्सरमध्ये केळीची साल, थोडा कापूर आणि लव्हेंडर तेल घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. असे केल्याने डासही पळून जातात. केळी, कापूर आणि लव्हेंडर तेलाचा वास त्वरित डासांच्या प्रतिकारासाठी योगदान देऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Mosquitoes are growing in the house this simple remedy of banana peel will kill mosquitoes sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.