• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why leafy green vegetables are suggested in winter for healthy lifestyle ndj

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या का खाव्यात? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

Leafy Green Vegetables : पालेभाज्यासुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत, हे जाणून घेणार आहोत.

December 7, 2024 18:03 IST
Follow Us
  • Leafy Green Vegetables
    1/9

    हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. (Photo : Freepik)

  • 2/9

    पालेभाज्यासुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत, हे जाणून घेणार आहोत. दी इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे न्युट्रिशनिस्ट नारंग यांच्या हवाल्याने याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    पालक – पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी व फोलेट भरपूर प्रमाणामध्ये असते. पालक ॲनिमियाचा सामना करण्यासाठीही मदत करते; तसेच रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते. पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्याशिवाय त्यामधील मॅग्नेशियम ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळते. पालक हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे; जो पचनक्रिया सुधारतो. सूप, करी किंवा सॅलडमध्ये पालकचा वापर केला जातो. मसाले आणि इतर घटकांचा समावेश पालकाची चव आणखी वाढते. (Photo : Freepik)

  • 4/9

    केल- केल ही एक पालेभाजी असून, ती आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि ते आजारांपासून दूर ठेवते. (Photo : Freepik)

  • 5/9

    मोहरीच्या पानांची भाजी – आशियाई आणि भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोकप्रिय असलेली भाजी म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी. या भाजीमध्ये सी, के व बीटा-कॅरोटीन ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात; जी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 6/9

    मेथीची पाने (मेथी) : मेथीमध्ये लोह, फायबर व प्रोटीन्स यांचे प्रमाण भरपूर असते; ज्यामुळे थकवा दूर राहून, ऊर्जा टिकण्यासाठी साह्य मिळते. मेथीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी पराठा, डाळ, भाज्यांमध्ये मेथीचा समावेश करावा. (Photo : Freepik)

  • 7/9

    काश्मिरी साग (Collard Greens) : ही भाजी सर्वांत जास्त काश्मीरमध्ये दिसून येते. त्यामध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि सहज विरघळणारे फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. ही भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. या भाजीमध्ये ग्लुकोसिनोलेट्सदेखील असतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. हिवाळ्यात ही भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. (Photo : Freepik)

  • 8/9

    राजगिरा पाने : राजगिरा म्हणजे लाल पालक, ज्याला आपण लाल माठाची भाजी, असेसुद्धा म्हणतो. त्यामध्ये लोह, कॅल्शियम व पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते; जे स्नायू आणि हाडांचे आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर आहे. राजगिरा हा फायबरयुक्त असून, त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचासुद्धा समावेश आहे; जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय राजगिऱ्याची भाजी ऑक्सिडेटिव्ह तणावसुद्धा कमी करते. (Photo : Freepik)

  • 9/9

    तुम्हाला आवडतात त्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. या भाज्या ओल्या कापडात किंवा किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी या भाज्या त्यावरील धूळ किंवा कीटकनाशके दूर करण्यासाठी नीट स्वच्छ करून घ्या. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Why leafy green vegetables are suggested in winter for healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.