-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, तोपर्यंत हा १०१ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. १०१ दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पुढील १०१ दिवस मेष राशीच्या राशीसाठी शुभ परिणाम घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा १०१ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
येणारे १०१ दिवस ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्तीचे सुख; शनीचे राशी परिवर्तन देणार आनंदी आनंद
Shani Gochar 2024: शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील.
Web Title: Shani rashi parivartan 24 for the next 101 days the persons of these three zodiac signs will get the happiness of wealth sap