-
लवकरच नवीन वर्ष सुरु होणार असून येणारे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोणातून खूप खास मानले जाणार आहे. या वर्षात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जे काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तसेच अंकशास्त्रानुसार, २०२५ या वर्षाचा मूलांक ९ असल्याने हे वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळाचे असेल. या वर्षावर मंगळ ग्रहाचे अधिक वर्चस्व असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ हा साहस, ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या वर्षात काही राशींच्या व्यक्तींवर मंगळाचा शुभ तर काही राशींच्या व्यक्तींवर मंगळाचा अशुभ प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२५ हे वर्ष खूप उत्तम फळ देणारे ठरेल. कारण मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे जो या व्यक्तींमध्ये अधिक आत्मविश्वास आणि साहस निर्माण करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन वर्ष खूप अनुकूल सिद्ध होईल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना देखील २०२५ हे वर्ष फायदेशीर ठरेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात हव्या गोष्टी मिळवता येतील. या काळात प्रमोशन होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींना देखील २०२५ हे वर्ष खूप सकारात्मक सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात अनेक गोष्टी साध्य करता येतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींनाही २०२५ खूप लकी सिद्ध होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात सुख, समाधान प्राप्त होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नवीन वर्ष मंगळ ग्रहाचे; ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसाच पैसा
New Year 2025: अंकशास्त्रानुसार, २०२५ या वर्षाचा मूलांक ९ असल्याने हे वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळाचे असेल. या वर्षावर मंगळ ग्रहाचे अधिक वर्चस्व असेल.
Web Title: Mangal rashi parivartan 25 the person of this 5 zodiac sign will earn money sap