• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. constantly texting or using mobile know about the smartphone pinky syndrome snk

Smartphone Pinky Syndrome : काय आहे ‘हा’ स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम? जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार?

सतत मोबाइल वापरत आहात? तुम्हालाही होऊ शकतो ‘स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम’! जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार?

January 8, 2025 16:42 IST
Follow Us
  • Constantly texting or using mobile know about the smartphone pinky syndrome
    1/10

    आधुनिक जगात मोबाइल तंत्रज्ञान किंवा स्मार्टफोनचा वापर करणे हे जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग बनले आहे. एखादी व्यक्ती दररोज स्मार्टफोनवर सरासरी पाच तासांपेक्षा जास्त वेळ घालवते.

  • 2/10

    लॉकडाऊनमुळे मोबाइल वापरण्याचा वेळ वाढला आहे, त्यामुळे करंगळी वाकडी झाल्याची तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. करंगळी वाकडी होण्याला ‘पिंकी फिंगर’ म्हणून ओळखले जाते. 

  • 3/10

    स्मार्टफोन वापरताना करंगळी त्याचे वजन सहन करते, ज्यामुळे ही स्थिती उद्भवते; यालाच “स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम” असेही म्हणतात.Constantly texting or using mobile know about the smartphone pinky syndromeस्मार्टफोन वापरताना करंगळी त्याचे वजन सहन करते, ज्यामुळे ही स्थिती उद्भवते; यालाच “स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम” असेही म्हणतात.

  • 4/10

    “स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम म्हणजे नक्की काय?
    फोनची मोठी स्क्रीन वापरल्याने तुमच्या बोटांना आणि अंगठ्याला दुखापत होऊ शकते, कारण तुम्ही त्यांचा जास्त प्रमाणात वापर करता, त्यामुळे त्यांची खूप हालचाल होते आणि त्यामुळे थकवा किंवा वेदना होतात. अंगठ्याच्या अस्थिबंधनावर (लिगामेंट) हळूहळू ताण येतो. अस्थिबंध हे अत्यंत सूक्ष्म तंतू असतात, जे हाडे एकमेकांना जोडतात.

  • 5/10

    दीर्घकाळ मोबाइल वापरताना बोटांवर वारंवार ताण येतो आणि पुढे ऑस्टियोआर्थरायटिस (osteoarthritis) होऊ शकतो, ज्यामुळे हाडांना नुकसान पोहचू शकते; कारण सांध्यातील कूर्चा (cartilage) क्षीण होऊ लागतो. जेव्हा संधिवात बोटांमध्ये होतो तेव्हा सांध्याभोवती हाड वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे नंतर बोट वाढू शकते किंवा विकृत होऊ शकते.

  • 6/10

    हे एखाद्याच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक नसले तरी इतर काही घटक आहेत जे सांध्यावरील झीज होण्याच्या दरांवर परिणाम करतात; जसे की आहार, कौटुंबिक इतिहास आणि आधीपासून अस्तित्वात असलेली आरोग्य स्थिती.

  • 7/10

    “स्मार्टफोन पिंकी”ची समस्या होऊ नये यासाठी काही टिप्स
    स्मार्टफोनचा वापर वारंवार टाळा.
    जर तुम्ही ते वापरत असाल तर त्याचा वापराचा कालावधी कमी करा.
    संदेश पाठवणे किंवा गेमिंगसाठी मोबाइल अगदी थोड्या वेळासाठी वापरा.

  • 8/10

    तुमचा हात दुखण्यापूर्वीच थोडा ब्रेक घ्या आणि तुमचा फोन खाली ठेवा.
    हाताची बोटे ताणून व्यायाम करा.
    टाइप करण्याऐवजी स्वाइप कीबोर्ड वापरा किंवा स्पीच (व्हाईस मेसेज) हे पर्याय वापरा.

  • 9/10

    तुमच्या मोबाइल फोनसाठी स्टँड वापरा किंवा टीव्हीवर एअरप्ले पर्याय वापरा.
    तुमचा हात दुखत असल्यास, सूज आणि दाहकता कमी करण्यासाठी मेडिकलमधून वेदना कमी करणारे औषध घ्या.
    *ठराविक वेळाने मोबाइल वापरताना हात बदला, जेणेकरून तो एका हातात जास्त काळ धरला जाणार नाही.

  • 10/10

    हे आपल्याला ‘स्मार्टफोन पिंकी’च्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करेल. जर गरज असले तर वैद्यकीय मदत घ्या. हातांच्या सांधे आणि करंगळीवरील ताण कमी करण्यासाठी तुमचा फोन वापरताना काळजी घ्या. सेल्फी काढताना किंवा ईमेल पाठवताना तुमचा फोन योग्य पद्धतीने पकडा. तुमच्या करंगळीवर ताण देऊ नका!

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Constantly texting or using mobile know about the smartphone pinky syndrome snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.