• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 7 after dinner habits that can sped up weight loss post dinner habits you need to stop to maintain good health sjr

Post Dinner Habits : रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ ७ सवयींमुळे वजन झटक्यात होईल कमी अन् रहाल निरोगी

Post-Dinner Habits : या सवयी केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत तर तुम्ही यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतात.

Updated: January 19, 2025 11:30 IST
Follow Us
  • Post-meal habits for weight loss
    1/9

    Post-Dinner Habits : वजन कमी करणे हे केवळ एक ध्येय नसून ती एक प्रक्रिया आहे. अगदी लहान- लहान सवयी फॉलो करत तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. आपण काय खातो, कसे खातो आणि खाल्ल्यानंतर काय करतो, या सगळ्याचा वजन कमी होण्यावर मोठा परिणाम होतो. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतरच्या सवयी तुमच्या चयापचय आणि वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या टिप्सचा समावेश करा.

  • 2/9

    १) हलके चालणे
    रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्याऐवजी, रात्रीच्या जेवणानंतर २०-३० मिनिटे हलका वॉक करा. यामुळे ना केवळ पचनक्रियाच सुधारत नाही तर कॅलरीस बर्न करण्यास देखील मदत करते.

  • 3/9

    २) पाणी किंवा ग्रीन टी प्या
    खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तुम्ही ग्रीन टी देखील पिऊ शकता, ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट घटक असतात. जे चयापचय क्रियेला चालना देतात आणि वजन कमी करण्यास मदत होते.

  • 4/9

    ३) टीव्ही आणि मोबाईचा वापर टाळा
    जेवताना टीव्ही पाहणे किंवा मोबाईलवर स्क्रोल करत असाल तर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खात राहता. त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात. त्यामुळे जेवताना सर्व गोष्टी दूर ठेवत फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करा.

  • 5/9

    ४) पुरेशी झोप घ्या
    वजन कमी करण्यासाठी ७-८ तासांची गाढ झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढू शकते. चांगली झोप घेतल्याने पचन आणि चयापचय व्यवस्थित राहते.

  • 6/9

    ५) तणाव व्यवस्थापित करा
    तणावामुळे आपल्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो. तणावामुळे लोक जास्त आणि बाहेरचं अन्न खाण्यास सुरुवात करतात. योग, ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा सराव करून तणाव कमी करा.

  • 7/9

    ६) फायबर आणि प्रथिने खा
    रात्रीच्या जेवणात फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश करा. हे पोषक घटक जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत करतात. तसेच, पांढरा तांदूळ, ब्रेड आणि पेस्ट्रीसारखे प्रक्रिया केलेले कार्ब टाळा.

  • 8/9

    ७) खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या
    तुमच्या खाण्याच्या सवयींची नोंद ठेवा. यामुळे आपल्याला आहारात काय बदलण्याची आवश्यकता आहे हे समजून घेण्यास मदत करेल. अन्न हळूहळू खा आणि चावून खा.

  • 9/9

    ८) रात्रीच्या जेवणानंतर वजन कमी करण्यासाठी आणखी काही टिप्स
    अन्न पटकन खाण्याऐवजी हळूहळू चावून खा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अति खाणे टाळता येते. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी, लहान भागांमध्ये खा. जेवल्यानंतर दात घासल्याने जास्तीची खाण्याची इच्छा कमी होते. (फोटो क्रेडिट: पेक्सेल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: 7 after dinner habits that can sped up weight loss post dinner habits you need to stop to maintain good health sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.