-
काही लोकांच्या तोंडाला तीव्र वास येतो. त्यामुळे त्यांना लाज वाटते. अनेकदा अशा लोकांच्या जवळ जाऊन बोलणे टाळले जाते. दरम्यान श्वासाच्या दुर्गंधीची अनेक कारणे असू शकतात.
-
जसे की नीट ब्रश न करणे, हिरड्यांचा त्रास किंवा दातात पोकळी. याशिवाय काही जीवनसत्त्वे किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही श्वासातून दुर्गंधी येऊ शकते.पण जर व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे श्वासाची दुर्गंधी येत असेल तर पुढील टिप्सचा अवलंब करून त्यापासून सुटका मिळू शकता.
-
व्हिटॅमिन डीची कमतरता : व्हिटॅमिन डी हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा दात आणि हिरड्यांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते.
-
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात अंडी, चीज, दूध, दही आणि संत्र्याचा रस यांसारख्या व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचा समावेश करू शकता. याशिवाय सूर्यप्रकाश हा देखील व्हिटॅमिन डीचा एक प्रमुख स्त्रोत आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशातील काही क्षणही फायदेशीर ठरू शकतात.
-
व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता: व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळेही श्वासाची दुर्गंधी, तोंडात फोड येणे आणि हिरड्या सुजणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी-12 शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
-
व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता शाकाहारी लोकांमध्ये अधिक सामान्य आहे परंतु योग्य आहाराने त्याची भरपाई केली जाऊ शकते. यासाठी तुम्ही सॅल्मन फिश, रेड मीट, बदामाचे दूध, अंडी, दही, पालक, अंजीर, मशरूम आणि टोमॅटो यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.
-
व्हिटॅमिन सीची कमतरता : व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्या सुजणे, रक्तस्त्राव आणि संसर्ग यासारख्या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. व्हिटॅमिन सी आपल्या रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे शरीरात कमकुवतपणा येऊ शकतो.
-
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही द्राक्षे, लिंबू, संत्री, स्ट्रॉबेरी, पालक आणि टोमॅटो यासारख्या पदार्थांचे सेवन करू शकता.
Bad Smell From Mouth Treatment : ‘या’ जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे जाणवते श्वासाची दुर्गंधी; वेळीच आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
Bad Smell From Mouth Treatment : काही लोकांच्या तोंडाला तीव्र वास येतो. त्यामुळे त्यांना लाज वाटते. पण अशाप्रकारे श्वासाची दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात, कधी कधी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.
Web Title: Bad smell from mouth treatment mouth odor how to get rid ofmouth odor vitamin deficiency health tips in marathi sjr