-
फास्टफूड खायला आवडत नाही असा आपल्यातील एकही जण शोधून सापडणार नाही. कोणत्याही चायनिज सेंटरमध्ये गेले की, कोबीशिवाय त्यांचा एकही पदार्थ बनत नाही. चायनीज भेळ, कोबी मंचुरियन, पनीर टिक्का, चिकन चिली ते चायनीज भेळीस आदी अनेक पदार्थ कोबीसह उपलब्ध असतात. तसेच घरामध्येही केव्हा केव्हा स्पेशल मेनू असो किंवा साधी भाजी कोबी हजेरी लावतेच. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर मंडळी या कोबीचे अनेक आरोग्यदाई फायदे आहेत. पण, तुम्हाला नेहमीची कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्हाला पौष्टीक आणि टेस्टीही खायचे असेल तर तुम्ही कोबीचे पराठे बनवा. पराठे बनवण्यासाठी काय साहित्य लागेल जाणून घेऊ…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोबीचे पराठे बनवण्यासाठी पाव किलो कोबी, एक बटाटा, एक कांदा, लसूण, आलं, हळद, मसाला, गरम मसाला, मीठ, बेसनचे पीठ, तेल इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मार्केटमधून पाव किलो कोबी आणा. (कोवळे कोबी घ्या. कारण – पराठे छान होतात). (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोबी आणि बटाटा किसून घ्या. किसल्यानंतर स्वछ धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कांदा बारीक चिरून घ्या. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात लसूण (चार पाकळ्या), आलं, हळद, मसाला, गरम मसाला, मीठ, बारीक चिरून घेतलेला कांदा घाला आणि बारीक करून घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
कढईत दीड चमचा तेल टाका. मिक्सरद्वारे बारीक करून घेतलेले मिश्रण तेलात ओता आणि मिश्रण एकजीव करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
थोडं लालसर झालं की, कोबी, बटाटा त्यात घाला आणि थोडावेळ वाफवून घ्या. (पाणी आजिबात टाकू नका). (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एक मिनिटाने लगेच बंद करा. परातीत दोन वाट्या पीठ घ्या.वाफवून घेतलेले मिश्रण पिठात मिक्स करा आणि त्यात थोडे बेसनचे पीठ घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पीठ मळून घ्या आणि पाच मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर पोळ्या लाटा आणि तूप किंवा तेल लावून भाजून घ्या.अशाप्रकारे तुमचे कोबीचे पराठे तयार. कोबीचा पराठा रेसिपी! (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / @hitrecipes / @Freepik )
Kobi Paratha: कोबीची भाजी आवडत नाही? मग बनवा झणझणीत कोबीचा पराठा; वाचा सोपी रेसिपी आणि खास टिप्स
How To Make Kobi Cha Paratha: तुम्हाला नेहमीची कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.
Web Title: How to make kobi cha paratha read maharashtrian recipe in marathi asp