-
आजकाल, जर आपण निरोगी आहाराबद्दल बोललो तर बहुतेक लोक कच्च्या भाज्या खाण्याला प्राधान्य देतात. कारण कच्च्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात असे मानले जाते. पण, काही भाज्या कच्च्या खाल्ल्याने आरोग्याला हानी होते हे तुम्हाला माहीत आहे का? (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
-
त्यामध्ये असलेले विष आणि हानिकारक बॅक्टेरिया शरीराला गंभीर हानी पोहोचवू शकतात. आज आम्ही तुम्हाला त्या १२ भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या कच्च्या खाणं टाळलं पाहिजे. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
-
दुधी भोपळा
दुधी भोपळा कच्चा खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. दुधी भोपळा शिजवल्याने त्यातील विषारी घटक निघून जातात आणि पचायला सोपे होते. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
शिमला मिरची
शिमला मिरची कच्ची खाल्ल्यास पोटासाठी जड होऊ शकते. त्यात बॅक्टेरिया आणि परजीवी (पॅरासाइट्स) असू शकतात, जे पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. शिजवल्यावर ते पचायला सोपे होते. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
क्रूसिफेरस भाज्या
क्रूसीफेरस भाज्यांमध्ये ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी या भाज्यांचा समावेश होतो, ज्या कच्च्या खाल्ल्यास पोटाच्या समस्या आणि पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते. यामध्ये टेपवर्म्स आणि इतर हानिकारक जीवाणू असू शकतात, जे शिजवल्यावर नष्ट होतात. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
ब्रुसेल्स स्प्राउट्स
ब्रुसेल्स स्प्राउट्स कच्चे खाल्ल्याने पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. हलके भाजून किंवा शिजवून खाल्ल्याने त्याचे पोषण वाढते आणि पचायला सोपे जाते. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
वांगी
वांग्यामध्ये ‘सोलॅनिन’ नावाचे अल्कलॉइड कंपाऊंड असते, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. ते कच्चे खाणे टाळा आणि पूर्णपणे शिजवल्यानंतरच खा. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
ग्रीन बीन्स
‘लेक्टिन्स’ नावाचे विषारी तत्व ग्रीन बीन्समध्ये आढळते, जे पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. ते कच्चे खाल्ल्याने कमी पोषण मिळते आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
दोडका
कच्च्या दोडक्यामध्ये काही घटक असतात ज्यामुळे पोटात गॅस आणि क्रॅम्प होऊ शकतात. ते शिजवल्याने ही समस्या दूर होते. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
मशरूम
काही प्रकारच्या मशरूममध्ये नैसर्गिकरित्या विषारी पदार्थ असतात ज्यामुळे उलट्या होणे, चक्कर येणे आणि काहीवेळा अवयवांचे नुकसान होऊ शकते. ते नेहमी शिजवलेले खा. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
बटाटा
कच्च्या बटाट्यामध्ये ‘सोलॅनिन’ नावाचे विषारी घटक आढळतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कच्चा बटाटा खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बटाटे नेहमी नीट शिजवून खावेत. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
भोपळा
भोपळा कच्चा खाणे कठीण आहे. न शिजवता खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. हलके शिजवल्यानंतरच खा. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
पालक
कच्च्या पालकामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, जे कॅल्शियम शोषणात व्यत्यय आणते आणि मूत्रपिंडात स्टेन्स होऊ शकते. पालक नेहमी हलके शिजवल्यानंतर खा. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
स्प्राउट्स
स्प्राउट्स कच्चे खाणे हानिकारक बॅक्टेरियासाठी अनुकूल असू शकते. म्हणून, स्प्राउट्स नेहमी वाफवून किंवा हलके ब्लँचिंग केल्यानंतर खा. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स) -
निरोगी आहारासाठी भाज्यांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे, परंतु प्रत्येक भाजी कच्ची खाणे सुरक्षित नाही. यातील काही भाज्या कच्च्या खाल्ल्याने केवळ पचनसंस्थेलाच हानी पोहोचत नाही तर शरीरातील विषारी घटकांचा प्रभावही वाढू शकतो. त्यामुळे या भाज्या शिजवून खाणे आरोग्यासाठी चांगले असते. निरोगी आणि सुरक्षित आहारासाठी नेहमी योग्य माहितीचे अनुसरण करा. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
१२ भाज्या ज्या कधीही कच्च्या खाऊ नयेत! शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम
भाज्या कच्च्या खाऊ नयेत: भाज्यांना आपल्या आहारात महत्त्वाचं स्थान आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की काही भाज्या कच्च्या खाणं तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं? कच्च्या भाज्यांमध्ये असलेले काही घटक शरीराला हानी पोहोचवू शकतात आणि पाचन समस्या निर्माण करू शकतात.
Web Title: This vegetables never eat raw can harm your health you should cook them and eat these veggies jshd import dvr