• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what type of food increase obesity or making you fatter ndj

लठ्ठपणा कशामुळे वाढतो? काय खावे अन् काय खाऊ नये; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

खरंच फॅट्सच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वेदिका प्रमानी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

January 31, 2025 20:37 IST
Follow Us
  • food That Can Make You Fatter
    1/9

    सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होतात, ज्यामध्ये फॅट्सच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो, असा दावा केला जातो. अशा दाव्यांमुळे अनेकदा गैरसमज पसरतात आणि फॅट्स आरोग्यासाठी धोकादायक आहे, असे वाटते. (Photo : Freepik)

  • 2/9

    पण खरंच फॅट्सच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वेदिका प्रमानी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. (Photo : Freepik)

  • 3/9

    खरं तर आपल्या शरीरात कर्बोदके, प्रोटिन फॅट्स असे पोषक घटक असतात, जे शरीराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यांसाठी उपयुक्त ठरतात. शिफारस केलेल्या दैनंदिन प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात फॅट्सचे सेवन केल्यास पौष्टिक कमतरता जाणवू शकते. कारण- सर्व फॅट्सयुक्त पदार्थांमध्ये जास्त ऊर्जा आणि कॅलरी असते. त्याशिवाय पौष्टिक घटक हे फॅट्सच्या प्रकारावर अवलंबून असतात. (Photo : Freepik)

  • 4/9

    ट्रान्स-फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स हे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL)ची पातळी वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवू शकतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होतात. लोणी, तूप, तसेच नारळ आणि पाम तेल (मिठाई आणि बिस्किटांमध्ये वापरले जाते) यांमध्ये सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. त्याशिवाय दूध, मलई, चीज, केक व चॉकलेटमध्येही सॅच्युरेटेड फॅट्स असतात. (Photo : Freepik)

  • 5/9

    अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे सेवन मग ते मोनोअनसॅच्युरेटेड असो किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड आरोग्यासाठी चांगले आहे. अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल, सूर्यफुलाचे तेल, सुकामेवामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. (Photo : Freepik)

  • 6/9

    २०१८ ला हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने एक अभ्यास केला. या अभ्यासासाठी त्यांनी २० वर्षांपेक्षा जास्त काळ १,२०,००० पुरुष आणि स्त्रियांना निरीक्षणाखाली ठेवले. जेव्हा या लोकांनी त्यांच्या आहारात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे सेवन वाढवले तेव्हा त्यांची वजन वाढण्याची शक्यता जास्त होती; पण अनसॅच्युरेटेड फॅट्सच्या सेवनाचा यात कोणताही उल्लेख नव्हता.
    खूप जास्त ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स खाल्ल्याने चार वर्षांच्या कालावधीत सरासरी १-१/३ पाउंड म्हणजेच ०.६०४७९ किलो वजन वाढते, असे या अभ्यासातून दिसून आले. (Photo : Freepik)

  • 7/9

    प्रत्येक प्रकारच्या फॅटचा शरीरावर वेगवेगळा परिणाम दिसून येतो. सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचा इन्सुलिन रेझिस्टन्सवर परिणाम होतो; ज्यामुळे शरीरातील पेशी ग्लुकोज योग्य प्रकारे शोषू शकत नाहीत. अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडने वजन वाढत नाही. सॅल्मन, अक्रोड व सूर्यफूल बियांमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळते आणि ते इन्सुलिन रेझिस्टन्सला प्रोत्साहन देते; ज्यामुळे फॅट्सचा साठा संतुलित राहतो. (Photo : Freepik)

  • 8/9

    जेव्हा तुमच्या आहारात फॅट्ससह कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते, तेव्हा अति कॅलरीमुळे शरीरात फॅट्सचा साठा वाढतो. जेव्हा लोक फॅट्सचे सेवन कमी करतात तेव्हा त्यांना पोषक घटकांच्या कमरतेमुळे कर्बोदकांचे सेवन करण्याची इच्छा होते. पण, आपण आपल्या कर्बोदकांचे सेवन कमी केले पाहिजे. साखर, जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, तसेच फळांच्या रसाचे सेवन टाळले पाहिजे. (Photo : Freepik)

  • 9/9

    कर्बोदके, प्रोटीन्स, फॅट्स आणि अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांसह संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी अडीच ते तीन लिटर पाणी पिणेसुद्धा आवश्यक आहे. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: What type of food increase obesity or making you fatter ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.