• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. heart attack chest pain news really chest pain is always symptom of heart attack ndj

Heart Attack & Chest Pain : छातीत दुखणे हे नेहमी हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असते का?

Heart Attack & Chest Pain : इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल यांनी छातीत दुखण्याची सामान्य कारणे आणि त्यावर उपचार कसे करावे, याविषयी इंडियन एक्स्प्रेसला खास माहिती सांगितली.

February 7, 2025 21:32 IST
Follow Us
  • Heart Attack & Chest Pain
    1/9

    छातीत दुखण्याचा थेट संबंध हृदयविकाराच्या झटक्याशी जोडला जातो. छातीत दुखण्याचं लक्षण जरी सौम्य वाटत असले तरी काही वेळा मेडिकल इमर्जन्सीचे कारण ठरू शकते. (Photo : Freepik)

  • 2/9

    तुम्हाला माहिती आहे का, छातीत दुखणे या लक्षणाचा संबंध हृदयविकाराच्या झटक्यांसह हृदयाशी संबंधित समस्यांशी जोड असला, तरी ही समस्या हृदयाद्वारे उद्भवलेली नसते. (Photo : Freepik)

  • 3/9

    इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल यांनी छातीत दुखण्याची सामान्य कारणे आणि त्यावर उपचार कसे करावे, याविषयी इंडियन एक्स्प्रेसला खास माहिती सांगितली. (Photo : Freepik)

  • 4/9

    हृदयविकाराशी संबंध नसलेली कारणे
    गॅस्ट्रोइन्टेस्टीनल समस्या
    स्नायुशी संबंधित समस्या
    एंन्झायटी आणि पॅनिक अटॅक (Photo : Freepik)

  • 5/9

    हृदयाशी संबंधित कारणे
    हृदयविकाराच्या स्थितीत छातीत दुखणे गंभीर असते आणि त्यासाठी लगेचच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यकता असते, असे डॉ. गोयल सांगतात.
    जेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा छातीत दुखते, या प्रकाराला अन्जायना म्हणतात. अनेकदा यामुळे शारीरिक हालचालींवर परिणाम होतो किंवा तणाव वाढतो आणि छातीत दाब निर्माण झाल्यासारखे वाटते. (Photo : Freepik)

  • 6/9

    हृदयविकाराचा झटका :
    हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत दाब निर्माण होणे किंवा छातीत दाटून येणे आणि अनेकदा हा दाब हात, पाठ, मान किंवा जबड्यात पसरण्याची शक्यता असते. इतर काही लक्षणे खालीलप्रमाणे –
    श्वास घेण्यास त्रास होणे
    घाम येणे
    मळमळ वाटणे (Photo : Freepik)

  • 7/9

    वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?
    छातीत दुखण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. याबाबत सावधगिरी बाळगून डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. विशेषत: जेव्हा अचानक इतर धोकादायक लक्षणे दिसत असतील, असे डॉ. गोयल सांगतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    खालील लक्षणे दिसून आली तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
    श्वास घेण्यास त्रास होणे
    मळमळ किंवा उलट्या होणे
    चक्कर येणे
    सतत जास्त वेळ छातीत दुखणे.
    छातीतील वेदना शरीराच्या इतर भागास जसे की हात किंवा जबड्यामध्ये पसरत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)

  • 9/9

    छातीत दुखणे कमी झाले तरी आरोग्याविषयी सतर्क राहण्यासाठी आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Heart attack chest pain news really chest pain is always symptom of heart attack ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.