-
यश मिळविण्यासाठी ५ जपानी टेक्निक
प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते, मग ते अभ्यासात असो, करिअरमध्ये असो, नोकरीमध्ये असो किंवा व्यवसायात असो. यशासाठी खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागतो. पण, यश मिळवणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. हा एक सततचा प्रयत्न आहे, ज्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. खरं तर, जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या आयुष्यात काही गोष्टींचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. अगदी जपानच्या लोकांसारखे. ते त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी गाठीप्रमाणे बांधून ठेवतात. या गोष्टी काय आहेत, चला सविस्तर जाणून घेऊया. -
कायझेन – सतत सुधारणा
कायझेन हा शब्द दोन जपानी शब्दांपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ “चांगला बदल” किंवा सतत सुधारणा असा होतो. कायझेनची मुळे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जपानी गुणवत्ता क्षेत्रांमध्ये आहेत, जिथे लोकांना असे दिसून आले की, यशस्वी होण्यासाठी त्यांना त्यांच्या पद्धती आणि त्यांच्या कामात नियमित सुधारणा करणे आवश्यक आहे. यासह कठोर परिश्रम करून, तुम्ही त्या कामात यशस्वी होऊ शकता किंवा तुम्ही प्रगती करू शकता. -
मुरी – मुरी (अतिभार किंवा अवास्तव)
मुरी हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ अत्यधिक ओझे किंवा अवास्तव आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा तुम्ही तुमच्या टीमला त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अयोग्य किंवा अनावश्यक कामाची मागणी करून ताण देता तेव्हा तुम्ही गोंधळ निर्माण करता. म्हणून तुम्हाला मुरी टाळावी लागेल. तुम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव टाळावा कारण जेव्हा दबाव कमी असतो तेव्हा तुम्ही आरामात काम करू शकता आणि तुमचे सर्वोत्तम देऊ शकता. -
गॅम्बेट – गॅम्बेट (निर्धार)
जपानमधील लोक नेहमीच या शब्दाने प्रभावित होतात. याचा अर्थ कोणत्याही गोष्टीसाठी तुमचे सर्वोत्तम देण्याची इच्छा असणे. जेव्हा तुम्ही हे पाळता तेव्हा तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होऊ शकता. जपानी लोक हे निश्चितपणे पाळतात. असे मानले जाते की, जेव्हा तुम्ही असे काही करता तेव्हा तुम्हाला यश मिळतेच. -
फुरो शिकी – फुरो शिकी (नियमित सराव)
हा शब्द साधनसंपत्तीचे प्रतीक आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत येतो आणि पूर्वजांच्या ज्ञानाशी जोडलेला आहे. जलद बदल आणि सोयीच्या या युगात, फुरो शिकी ही स्थिरतेची कला आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हेच करायला हवे. तुम्हाला या गतीने नियमितपणे आणि सातत्याने पुढे जाण्याचा सराव करावा लागेल ज्यामुळे यश मिळविण्यात मदत होऊ शकते. -
वन स्नान – वन स्नान (विश्रांतीची प्रक्रिया)
ही जपानी विश्रांतीची प्रक्रिया आहे. जपानमध्ये ते शिनरीन योकू म्हणून ओळखले जाते. यात घनदाट जंगलामध्ये शांत राहून आणि दीर्घ श्वास घेत, तुमच्या सभोवतालच्या निसर्गाचे निरीक्षण केले जाते. ही सोपी पद्धत प्रौढ आणि मुले दोघांनाही तणावमुक्त राहण्यास आणि नैसर्गिकरित्या आरोग्य आणि कल्याण वाढविण्यास मदत करू शकते. यामुळे शरीर आणि मन ताजेतवाणे होते आणि ते पुन्हा नव्याने कामाला सुरू करते, यामुळे शरीरास कठोर परिश्रम करण्यास ऊर्जा मिळते आणि आनंदी राहता येते. (फोटो क्रेडिट: फ्रीपिक)
Success Tips : नोकरी, व्यवसाय कमी वेळेत भरपूर यश मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ जपानी टेक्निक
5 Japanese techniques For Success: यशासाठी सतत कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला लवकर यश मिळेल. आयुष्यात यशस्वी होण्यास तुम्ही खालील ५ जपानी टेक्निक फॉलो करु शकता.
Web Title: Success tips 5 japanese technique for success in marathi as sjr