• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. puffing roti recipe how to make phulka read tips for making perfect phulka roti ndj

फुलका फुगत नाही? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

Phulka Roti recipe : आज आपण हाच फुलका कसा करावा, हे जाणून घेणार आहोत.

February 16, 2025 16:20 IST
Follow Us
  • Phulka Roti recipe
    1/9

    स्वयंपाक करायचं म्हटलं की आधी पोळी यायला हवी. पण या पोळीचे किती प्रकार आहेत. फुलका, चपाती, घडीची पोळी, पराठा, रुमाली पोळी इत्यादी. (Photo : Pexels)

  • 2/9

    पोळ्यांचे हे प्रकार शिकायचे असेल तर सुरुवात मात्र फुलक्यांनीच करावीत. कारण हा पोळीचा सर्वात सोपा प्रकार आहे. त्यामुळे आज आपण हाच फुलका कसा करावा, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)

  • 3/9

    सुरुवातीला दोन कप गव्हाचे पीठ घ्यावे.
    अर्धा चमचा मीठ, एक छोटा चमचा तेल आणि पीठ मळण्यासाठी पाणी घ्यावे.
    पिठामध्ये मीठ घाला आणि मिक्स करा. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्या. (Photo : Pexels)

  • 4/9

    थोडं पीठ एकत्र करा आणि त्यानंतर पाणी घाला. ज्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो.खूप जास्त सैल कणीक भिजवू नये.
    थोडीशी घट्ट आणि नरम अशी कणीक भिजवावी. (Photo : Pexels)

  • 5/9

    त्यानंतर थोडं तेल या कणीकला लावून पाच मिनिटे पीठ पुन्हा मळून घ्यावे.
    पीठ जितके मऊ असेल तितके फुलके चांगले होईल. त्यानंतर हे मळलेले पीठ अर्धा तासासाठी झाकून ठेवावे. (Photo : Pexels)

  • 6/9

    अर्धा तासानंतर कणीकला अर्धा चमचा उरलेले तेल लावून पीठ मळून घ्यावे.
    तुम्हाला ज्या आकाराचा फुलका पाहिजे त्या आकाराचा गोळा करावा. (Photo : Pexels)

  • 7/9

    या गोळ्याला चांगले मळून घ्या आणि पीठ लावून हलक्या हाताने गोळा लाटावा.
    कडेकडेला लाटून घ्यावा. गोळा थोडा मोठा झाला की तो आपोआप फिरतो. गरज पडली तर थोडे पीठ लावावे. (Photo : Pexels)

  • 8/9

    गॅसवर तवा ठेवा. तवा साधारण गरम झाला की त्यावर हा लाटलेली पोळी टाकावी.एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पूर्ण भाजून घ्यावी. त्यानंतर हा फुलका थेट गॅसवर भाजून घ्यावा. फुलका खूप छान फुगतो. (Photo : Pexels)

  • 9/9

    ज्यांना गॅसवर फुलका भाजायची भीती वाटते ते तव्यावर सुद्धा भाजू शकता. फक्त शेवटी गॅसवर न भाजता फुलक्याच्या पहिल्या बाजूला कडे कडेला सुती कपड्याने किंवा चमच्याने प्रेस करा. फुलका छान फुगेल. (Photo : Pexels)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodरेसिपीRecipe

Web Title: Puffing roti recipe how to make phulka read tips for making perfect phulka roti ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.