• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. drinking black coffee is beneficial for liver health what experts say sap

काळी कॉफी पिणे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञ काय सांगतात…

Coffee Liver Health: कॉफीमध्ये काही शक्तिशाली गुणधर्म आहेत, जे यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

February 18, 2025 12:07 IST
Follow Us
  • Drinking black coffee is beneficial for liver health
    1/9

    सकाळी कॉफी प्यायल्याने फक्त फ्रेशच वाटत नाही, तर तो तुमच्या यकृताचे रक्षण करण्याचा सर्वांत सोपा मार्ग असू शकतो. डॉ. सीरियाक अ‍ॅबी फिलिप्स त्यांच्या मते, कॉफीमध्ये काही शक्तिशाली गुणधर्म आहेत, जे यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    “कॉफी यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करते, यकृतातील चरबीमुळे होणारी जळजळ व डाग कमी करते, फॅटी लिव्हर रोगाचे सिरोसिसमध्ये रूपांतर होण्यास प्रतिबंध करते आणि सिरोसिसच्या रुग्णांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा विकास होण्यास प्रतिबंध करते किंवा कमी करते.” (फोटो सौजन्य: Freepik

  • 3/9

    त्यांनी पुढे सांगितले, “युरोपियन असोसिएशन ऑफ स्टडी ऑफ लिव्हर प्रॅक्टिस मार्गदर्शनानुसार, यकृताच्या कर्करोगाचा धोका असलेल्यांनी किंवा दीर्घकालीन यकृताचा आजार असलेल्या रुग्णांनी ते सेवन करावे. त्यांनी दिवसातून किमान तीन कप कॉफी पिण्याची शिफारस केली आहे.”(फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    डॉ. फिलिप्स पुढे म्हणतात की, झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी कॉफीचा शेवटचा कप घ्यावा. त्याशिवाय, ते म्हणतात की, कॉफीचा रक्तदाब किंवा हृदय गतीवर परिणाम होत नाही आणि रिफ्लक्स, गॅस्ट्र्रेटिस किंवा पोटात अल्सर होण्याचा त्रास होत नाही. यकृताच्या कर्करोगाचा धोका असलेल्या व्यक्तींनी, दररोज किमान तीन कप काळी, गोड न केलेली कॉफी प्यावी. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    त्यांनी पुढे सांगितले, “युरोपियन असोसिएशन ऑफ स्टडी ऑफ लिव्हर प्रॅक्टिस मार्गदर्शनानुसार, यकृताच्या कर्करोगाचा धोका असलेल्यांनी किंवा दीर्घकालीन यकृताचा आजार असलेल्या रुग्णांनी ते सेवन करावे. त्यांनी दिवसातून किमान तीन कप कॉफी पिण्याची शिफारस केली आहे.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    यकृताच्या कर्करोगाचा धोका असलेल्या व्यक्तींनी, दररोज किमान तीन कप काळी, गोड न केलेली कॉफी प्यावी. हे फायदे मुख्यत्वे क्लोरोजेनिक अॅसिड आणि कॅफिन यांसारख्या संयुगांपासून मिळतात, जे फॅटी लिव्हर रोग सिरोसिससारख्या गंभीर स्थितीत जाऊ नये यासाठी किंवा थांबवण्यासाठी एकत्र काम करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    कॉफी यकृतातील स्टेलेट पेशी सक्रिय होण्यास आणि जास्त प्रमाणात कोलेजन जमा होण्यास प्रतिबंध करते, कोलेजन हा यकृत फायब्रोसिसमधील एक प्रमुख घटक आहे. (वर्ल्ड जर्नल ऑफ हेपॅटोलॉजी, २०१७), लकॉफीमधील क्लोरोजेनिक आम्ल ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते, जे यकृताची जळजळ होण्यासह नुकसानीस कारणीभूत ठरतो (क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी, २०२०). (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    कॉफीचे घटक लिपिड ऑक्सिडेशन सुधारतात, यकृतातील चरबी जमा होण्यास कमी करतात, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग (NAFLD) वाढ रोखली जाते (BMC पब्लिक हेल्थ, २०२१). (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी (२०२०) च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज तीन कपपेक्षा जास्त सेवन केल्याने यकृताच्या कडकपणा कमी होतो, ” असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.परंतु, ते सावध करतात की, जास्त कॉफीचे सेवन (सहा कपांपेक्षा जास्त) फायदेशीर ठरू शकत नाही आणि त्यामुळे अस्वस्थता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Drinking black coffee is beneficial for liver health what experts say sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.