-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि कुकर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच शनीच्या स्थितीतही सतत विविध बदल होत असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, येत्या २८ फेब्रुवारी २०२५ रोजी शनी कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींना विशेष फायदा होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीची अस्त अवस्था अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीची अस्त अवस्था कर्क राशीसाठी फायदेशीर ठरेल. या काळात कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
धनु राशीच्या व्यक्तींसाठी शनीची अस्त अवस्था लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२८ फेब्रुवारीला शनीदेव होणार अस्त, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार, नवी नोकरी मिळणार
Shani Asta in kumbha 2025: पंचांगानुसार, येत्या २८ फेब्रुवारी २०२५ रोजी शनी कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींना विशेष फायदा होईल.
Web Title: Saturn asta from 28th february three zodiac signs will get a new job and money sap