-
ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला अत्यंत खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर हे परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन आणि अस्त, उदय या अवस्थाही खूप खास मानल्या जातात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या या अवस्थांचा १२ पैकी काही राशींवर विविध प्रभाव पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, आज २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी बुधाचा कुंभ राशीमध्ये उदय होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर विशेष प्रकारे पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. भाऊ-बहिण, मामा यांची मदत मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आईचे आरोग्यही उत्तम असेल. या काळात प्रमोशन होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही बुधाचा उदय अनेक चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आजपासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; बुधाचे राशी परिवर्तन देणार पगारवाढ अन् सौभाग्याचे सुख
Budh uday 2025: येत्या २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी बुधाचा कुंभ राशीमध्ये उदय होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर विशेष प्रकारे पाहायला मिळेल.
Web Title: Budh gochar 25 three zodiac signs salary increase and good luck sap