• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you constantly talking bad about others these simple tips will change your thoughts sap

सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलावसं वाटतं? ‘या’ सोप्या टिप्स तुमचे विचार बदलतील

Negative talking people: जर तुम्हालाही दुसऱ्यांबद्दल सतत वाईट बोलण्याचं किंवा विचार करण्याचं व्यसन जडलं असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.

March 10, 2025 15:02 IST
Follow Us
  • stop talking bad about others
    1/9

    असं म्हटलं जातं की, माणसाचे विचार त्याचं भविष्य घडवतात. जर तुम्ही स्वतःबद्दल नेहमी चांगला, सकारात्मक विचार केला, तर तुमच्याबरोबर तसंच होतं. पण, तुम्ही जर सतत नकारात्मक विचार करीत राहिला आणि स्वतःबरोबर इतरांबद्दलही वाईट विचार करू लागलात, तर त्यामुळे तुमच्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: Freepik

  • 2/9

    खरं तर, प्रत्येकाचे आयुष्य अडचणींनी भरलेले असते. मात्र, नेहमी सकारात्मक विचार करणारे लोक अडचणींवर मात करून पुढे जातात. तर, नकारात्मक विचार करणारे लोक अडचणींकडे बघत दोन पावलं मागे येतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    याच लोकांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्याची सवय असते. अशा लोकांची मानसिकता खूप नकारात्मक असते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    त्यामुळे लोक सहसा या लोकांशी बोलणं टाळतात. त्याच वेळी प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल वाईट बोलण्याची सवय तुमच्या नातेसंबंधांवर आणि मानसिक शांतीवर परिणाम करते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    जर तुम्हालाही दुसऱ्यांबद्दल सतत वाईट बोलण्याचं किंवा विचार करण्याचं व्यसन जडलं असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. त्यांचे अनुसरण करून, तुम्ही तुमची नकारात्मक मानसिकता त्वरित बदलू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    जर तुम्हीही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर कोणाबद्दल वाईट बोलत असाल, तर आजपासूनच ते थांबवा. लोकांमध्ये दोष शोधण्याऐवजी त्यांच्यात चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्ही सकारात्मकही व्हाल. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    जेव्हा जेव्हा तुमच्या मनात एखाद्याबद्दल वाईट विचार करण्याचा विचार येतो तेव्हा तेव्हा तुम्ही प्रथम याचा काय परिणाम होतो आणि त्याचा काय फायदा होतो याचा विचार केला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की, जवळजवळ कोणताही फायदा नाही आणि तोटा खूप मोठा आहे, तर स्वतःला गप्प ठेवा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    तुम्ही सकारात्मक लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. त्यामुळे त्यांचे विचार आणि ऊर्जा तुमच्यावर खूप प्रभाव टाकतील. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9


    असे म्हणतात की, माफ केल्याने सर्व काही पूर्वीसारखे सामान्य होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही छोट्या चुकांवरून कोणाच्याही चुका शोधल्या, तर ते तुमचेच नुकसान करेल आणि तुमची मानसिकता नेहमीच नकारात्मक राहील. अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीबद्दल क्षमा करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Do you constantly talking bad about others these simple tips will change your thoughts sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.