-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२४ मार्च २०२५ रोजी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार असून या राशीवर वृषभ राशीतील गुरूची दृष्टी पडेल, त्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या राजयोगाच्या प्रभावाने १२ राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या योगाच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश, आनंद आणि सुख, समृद्धीच् सुख मिळवता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, चंद्र २४ मार्च रोजी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून तो २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत या राशीत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या काळात गुरूची दृष्टी मकर राशीवर पडेल ज्याच्या प्रभावाने गजकेसरी राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग अत्यंत शुभ मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंल सकारात्मक ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या राशीच्या चंद्र दहाव्या घरात आहे. ज्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गजकेसरी राजयोग कन्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा राजयोग मकर राशीसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त करण्यास मदत मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
आता नुसता पैसाच पैसा; गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पाडणार
Guru and Chadra Yuti: पंचांगानुसार, चंद्र २४ मार्च रोजी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून तो २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत या राशीत राहील.
Web Title: Guru and moon create gajaksari rajya yoga these three zodic sign will get love money and success sap