-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
येत्या काही दिवसात शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान असून २९ मार्च रोजी रात्री १० वाजून ७ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
तसेच त्यानंतर ६ एप्रिल २०२५ रोजी मीन राशीत उदित होणार आहे. ज्याचा फायदा १२ राशींपैकी काही राशींच्या आयुष्यावर झालेला पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचा मीन राशीतील उदय मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचा उदय खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींनाही शनीच्या उदित अवस्थेने अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनी देणार अपार धनसंपत्तीचे सुख; मीन राशीतील उदयाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना संपत्ती, प्रेम अन् पैसा मिळणार
Shani gochar 2025: सध्या शनी कुंभ राशीत विराजमान असून २९ मार्च रोजी रात्री १० वाजून ७ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Web Title: Shani udya in meen 25 these three zodiac signs will get wealth love and money sap