-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा, शुभ-अशुभ योगांचाही चांगला-वाईट प्रभाव १२ राशींवर पडतो. तसेच सर्वात कष्टदायी मानली जाणारी शनीची साडेसातीही १२ राशींच्या व्यक्तींवर प्रभाव पाडते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जेव्हा शनी एखाद्या राशीच्या दुसऱ्या किंवा १२ व्या घरात असतो, तेव्हा त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ही साडेसाती अडीच वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये असते. म्हणजेच एकूण साडेसात वर्ष असते. म्हणून तिला साडेसाती असे म्हटले जाते.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, २९ मार्च रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या दिवशी साडेसात वर्ष (२०१७ ते २०२५) सुरू असलेली मकर राशीची साडेसाती संपणार आहे. त्यामुळे मकर राशीसह काही राशींवर शनीचा शुभ प्रभावही पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा संपताच शनीचा वृषभ राशीवरही शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या आर्थिक आणि भौतिक सुखात वाढ होईल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीची साडेसाती संपताच मिथुन राशीच्या व्यक्तींनाही त्याचे शुभ परिणाम अनुभवा येतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा काळ खूप कष्टदायक होता. त्यामुळे इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनी ‘या’ तीन राशींचे नशीब बदलणार; मकर राशीची साडेसातीतून सुटका होताच पैशांचा पाऊस पडणार
Shani SadeSati: शनीने २९ मार्च रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. या दिवशी साडेसात वर्ष (२०१७ ते २०२५) सुरू असलेली मकर राशीची साडेसाती संपली. त्यामुळे आता मकर राशीसह काही राशींवर शनीचा शुभ प्रभावही पाहायला मिळेल.
Web Title: Makar rashi shani sadesati end three zodic get good luck and happy life sap