Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to add apples into your daily diet here are expert share five tips asp

रोजच्या आहारात सफरचंदांचा समावेश कसा करावा? तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ खास टिप्स

Health Benefits Of Apple : रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर फळाच्या आरोग्यदायी फायद्यांचा तो दाखला आहे.

April 12, 2025 22:25 IST
Follow Us
  • How To Add Apples Into Your Daily Diet
    1/9

    रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर फळाच्या आरोग्यदायी फायद्यांचा तो दाखला आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने भरलेले सफरचंद हे फळ संपूर्ण आरोग्यासाठी अनेक फायदे देते. सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Apples) जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार व फिजिशियन डॉक्टर दिलीप गुडे यांच्याशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी सफरचंदामधील पौष्टिक गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    डॉक्टर गुडे यांच्या मते ‘सफरचंद ही सोन्याची पौष्टिक खाण आहे…
    सफरचंद हे न्यूट्रीशिनल पॉवरहाऊसचे केंद्र आहे. त्यामध्ये क जीवनसत्त्वसह भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असतात. तसेच सफरचंद हे पोटॅशियमचे उत्कृष्ट स्रोतदेखील आहे. त्यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियमनासाठी आवश्यक असलेली खनिजे आहेत. त्याव्यतिरिक्त सफरचंदामध्ये फायबर असते, जे पचनास मदत करते, तृप्तता वाढवते व वजन व्यवस्थापनात योगदानसुद्धा देते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    त्याव्यतिरिक्त सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे त्याच्या पौष्टिक प्रोफाइलच्या पलीकडे आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स, जसे की क्वेर्सेटिन व फ्लेव्होनॉइड्स, हृदयविकार, टाईप-२ मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. त्याशिवाय सफरचंदातील फायबर कन्टेन्ट्स परिपूर्णतेची भावना वाढवून आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून वजन व्यवस्थापनात योगदान देतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    … तर रोजच्या आहारात सफरचंदांचा समावेश कसा करावा?
    डॉक्टर गुडे म्हणाले की, सफरचंदाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात त्याचा समावेश करण्याचा विचार करा. स्नॅक्स म्हणून ताज्या सफरचंदाचा आनंद घ्या. सॅलड्स किंवा ओटमिलमध्ये (oatmeal) सफरचंदाचे तुकडे घाला किंवा स्वादिष्ट डेझर्टमध्ये त्याला बेक करा. अशा प्रकारे सफरचंदाला तुमच्या आहाराचा एक भाग बनवून, तुम्ही तुमचे एकूण आरोग्य सुधारू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    तुम्ही सफरचंदाचा दिवसातून अधिकाधिक फायदा घेऊ शकता का? (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    तुम्ही सफरचंदाचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी पुढील टिप्सचा नक्की विचार करा…(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    १. कीटकनाशकांचा संपर्क कमी करण्यासाठी शक्य असेल तेव्हा सेंद्रिय सफरचंद निवडा.
    २. सफरचंदाच्या सेवनापूर्वी ते स्वच्छ धुऊन घ्या; जेणेकरून त्याच्यावर असणारे मेण किंवा कीटकनाशके निघून जातील.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    ३. सफरचंदाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला खराब होण्यापासून रोखण्यासाठी सफरचंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
    ४. सफरचंदाच्या विविध जातींचे सेवन करा आणि त्यातले तुमचे आवडते कोणते तेही निवडा.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    ५. सफरचंदाला आपल्या आहाराचा नियमित भाग बनवा. तसेच या टिप्सचे पालन करून फळाच्या पौष्टिक गोष्टींचा पूर्णपणे उपयोग करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to add apples into your daily diet here are expert share five tips asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.