-
मूत्रपिंड हे शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याचे, रक्तदाब नियंत्रित करण्याचे आणि शरीरात द्रव संतुलन राखण्याचे काम करते. जीवनशैलीत बदल करून मूत्रपिंडाशी संबंधित बहुतेक आजार टाळता येतात. पण अनुवांशिक कारणांमुळे किंवा गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीमुळे मूत्रापिंडासंबंधित आजार टाळता येतात. अशावेळी मूत्रपिंड दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत.
-
कमी मीठ खा : जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. मीठ कमी करणे मूत्रपिंडांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच प्रक्रिया केलेले आणि जंक फूड टाळा आणि कमीत कमी मीठ असलेले घरगुती अन्न खा. यामुळे तुमचे रोजचे मीठ सेवन कमी करणे सोपे होईल.
-
रक्तातील साखरेची पातळी : मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांनी मूत्रपिंडासंबंधित आजारांचा धोका अधिक असतो. अशावेळी साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. ज्यांना मधुमेह नाही त्यांनीही रिफाइंड साखर आणि लवकर पचणारे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच जलद कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करावे कारण यामुळे मूत्रपिंडांना फायदा होतो.
-
दारूपासून दूर राहा : तज्ञांच्या मते, दारूचा किडनीच्या आजारांशी थेट संबंध नाही, परंतु जर जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मधुमेह किंवा उच्च रक्तदाब सारख्या समस्या उद्भवल्या तर ते किडनीचे आरोग्य आणखी बिघडू शकते. म्हणून, दारुचे सेवन कमी करणे किंवा ते पूर्णपणे बंद करणे मूत्रपिंडांसाठी फायदेशीर आहे.
-
बैठे जीवनशैली टाळा: शारीरिक हालचालींच्या अभावाने लठ्ठपणाची समस्या वाढवते. लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांसह अनेक आजारांचा धोका वाढतो. म्हणून मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करुन शरीराचे वजन नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे.
-
धूम्रपान टाळा : तंबाखू शरीरासाठी हानिकारक आहे. धूम्रपानाने केवळ हृदय आणि फुफ्फुसांवरचं परिणाम होत नाही, तर यामुळे मूत्रपिंडांनाही नुकसान पोहोचवू शकते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडते आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो. जर आधीच मूत्रपिंडाचा आजार असेल तर धूम्रपान केल्याने त्याची स्थिती आणखी बिकट होऊ शकते.
किडनी दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी!
Kidney Failure Symptoms And Treatment : मूत्रपिंड हे शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याचे, रक्तदाब नियंत्रित करण्याचे आणि शरीरात द्रव संतुलन राखण्याचे काम करते. यामुळे जीवनशैलीत बदल करून मूत्रपिंडाशी संबंधित बहुतेक आजार टाळू शकता.
Web Title: Things to keep in mind to keep kidney healthy health tips in marathi sjr