Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why is important to drink more water during summer asp

उन्हाळ्यात पाणी पिण्याचे फायदे काय? जास्त पाणी प्यायल्याने शरीराला काय फायदा होतो? जाणून घ्या

Drinking Water Benefits : पाणी हे जीवन आहे असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते, त्यामुळे पाणी अजिबात वाया घालवू नये, त्याचप्रमाणे कमी पाणी प्यायल्यानेसुद्धा अनेक आजार होतात.

April 24, 2025 21:48 IST
Follow Us
  • How Much Water Does Body Need In Summer
    1/9

    पाणी हे जीवन आहे असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते, त्यामुळे पाणी अजिबात वाया घालवू नये, त्याचप्रमाणे कमी पाणी प्यायल्यानेसुद्धा अनेक आजार होतात. बऱ्याच लोकांना हिवाळ्यात पाणी पिण्याची इच्छा होत नाही. पण, जर तुम्ही उन्हाळ्यातही हे करत असाल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतात, त्यामुळे दिवसातून किती पाणी प्यावे याचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    तुमच्या शरीराचे संकेत समजून घ्या : जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हाच पाणी पिण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तुमच्या हालचाली लक्षात ठेवा : जर तुम्ही बाहेर काम करत असाल किंवा शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला पाण्याची गरज भासू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    सकाळी एक ग्लास पाणी प्या : सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने होते आणि चयापचय सुधारते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    जास्त फळे आणि भाज्या खा : टरबूज, काकडी आणि संत्री यांसारखी फळे आणि भाज्या तुमच्यासाठी सर्वोत्तम असतील. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे?
    साधारणपणे, एका सामान्य व्यक्तीला दररोज २.५ ते ३ लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते. पण, हे प्रमाण तुमच्या शरीराचे वजन, शारीरिक हालचाली आणि हवामानावर अवलंबून असते. उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे पाण्याची गरज जास्तसुद्धा भासू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    उन्हाळ्यात पाणी पिण्याचे फायदे (Benefits Of Drinking Water )
    शारीरिक क्षमता वाढविण्यास मदत होते : पाणी पिण्यामुळे शरीराला केवळ हायड्रेटेड ठेवता येत नाही तर दिवसभराच्या कामासाठी ऊर्जादेखील मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभर चांगले काम करू शकता. जेव्हा शरीर पूर्णपणे हायड्रेटेड असते, तेव्हा शारीरिक हालचालीतदेखील सुधारणा होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते : जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सर्वात आधी तुम्ही पुरेसे पाणी प्यावे. असे केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    मेंदूचे कार्य सुधारते : डिहायड्रेटड शरीर साधी कामेदेखील करू शकत नाही, कारण मेंदूवर हायड्रेशनचा मोठा परिणाम होतो. अभ्यासानुसार, थोडेसे डिहायड्रेशनदेखील मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Why is important to drink more water during summer asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.