-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, २८ एप्रिल रोजी शनी त्याचे स्वामीत्व असलेल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी प्रवेश करणार असून या नक्षत्रामध्ये तो ३ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असेल. ज्याचा फायदा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींना होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्योतिषशास्त्रातील २७ नक्षत्रांमध्ये १२ राशी विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे ग्रह राशी परिवर्तन करतात त्याप्रमाणे नक्षत्र परिवर्तनही करतात. राशी परिवर्तनाइतकेच नक्षत्र परिवर्तनही खूप प्रभावी आणि खास मानले जाते. ज्योतिषशास्त्रात पुष्य, अनुराधा आणि उत्तराभाद्रपद या नक्षत्रांचा स्वामी शनी आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तरगाभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तराभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
शनीचा उत्तराभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींचा वाढणार बँक बॅलन्स; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने उत्पन्नात होणार वाढ
Shani Transit 2025: पंचांगानुसार, २८ एप्रिल रोजी शनी त्याचे स्वामीत्व असलेल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी प्रवेश करणार असून या नक्षत्रामध्ये तो ३ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असेल.
Web Title: Shani uttarashada nakshatra 25 these three zodic get more profit sap