Benefits of Herbal Tea : आपण जो सामान्य चहा पितो – मसाला चहा किंवा दुधाचा चहा असतो, त्याचे पौष्टिक मूल्य कमी असते. त्याऐवजी अनेक फायदे असलेला हर्बल चहा का पिऊ नये? निरोगी शरीरासाठी हर्बल चहा फायदेशीर आहेत:
ब भारतीयांसाठी चहा पिणे हा एक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. आपण जो सामान्य चहा पितो – मसाला चहा किंवा दुधाचा चहा असतो, त्याचे पौष्टिक मूल्य कमी असते. त्याऐवजी अनेक फायदे असलेला हर्बल चहा का पिऊ नये? निरोगी शरीरासाठी हर्बल चहा फायदेशीर आहेत: (स्रोत- फ्रीपिक)
1/9
कॅमोमाइल चहा, जो कॅमोमाइच्या फुलांपासून बनतो. हा एक लोकप्रिय हर्बल चहा आहे. बेंगळुरूच्या एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटेटिक्स एडविना राज यांच्या मते, “त्याचा नाजूक फुलांचा स्वाद आपल्या स्नायूंना आराम देण्यास आणि मनाला शांत करण्यास मदत करतो, ज्यामुळे झोपण्यापूर्वी आराम करण्यासाठी ते परिपूर्ण बनते.” (स्रोत-फ्रीपिक)
“तणाव किंवा रात्रीला झोप न येणाऱ्या प्रत्येकासाठी, कॅमोमाइल एक फायदेशीर पर्याय आहे,” राज सांगतात. (स्रोत-फ्रीपिक) अति प्रमाणात कॅमोमाइल चहा प्यायल्याने पोटफुगी होऊ शकते. म्हणून, पेपरमिंट चहा फायदेशीर ठरू शकतो. तो उत्साहवर्धक आहे आणि पोटातील त्रास कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो, असे राज सांगतात. पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांच्या मते, “मेन्थॉलच्या उपस्थितीमुळे पेपरमिंट चहा पचन आणि श्वसनास आराम देतो.” (स्रोत- फ्रीपिक)आल्याच्या चहामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्याचे दाहक-विरोधी फायदे आहेत; ते घसा खवखवण्यापासून मुक्त होण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, असे राज सांगतात. (स्रोत- फ्रीपिक)राज यांनी मध आणि लिंबूचा चहामध्ये घालण्याचा सल्ला दिला. यामुळे तुम्हाला एक आरामदायी आरोग्य टॉनिक मिळेल. (स्रोत- पेक्सेल्स) राज म्हणाले, त्याच्या चमकदार माणिक रंगामुळे, हिबिस्कस चहा केवळ दिसायला सुंदरच नाही तर हृदयाला अनुकूल पेय देखील आहे. “हे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.” (स्रोत- फ्रीपिक)शिवाय, त्याचा तिखट, क्रॅनबेरीसारखी चव अतिशय सुरेख आहे. (स्रोत- फ्रीपिक) ग्रीन टीला हर्बल म्हणून वर्गीकृत केले जात नाही, तरीही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चयापचय वाढविण्यास आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. ग्रीन टी तुमच्या आरोग्याचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून काम करते, असे राज सांगतात. (स्रोत- फ्रीपिक)