• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 7 countries where getting a student visa is easy and education is affordable jshd import rak

Easy Student Visa Countries for Indian Students | तुम्हालाही परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग ‘या’ देशांचा व्हिसा मिळवणे आहे सर्वात सोपे; जाणून घ्या सविस्तर

Best countries to study abroad for Indians : दरवर्षी, लाखो भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी अर्ज करतात परंतु त्यांना अनेकदा व्हिसा प्रक्रियेतील गुंतागुंत आणि इतर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत चांगल्या शिक्षणासाठी तुम्ही कोणत्या पर्यायांचा विचार करू शकता हे आपण जाणून घेणार आहोत.

Updated: May 5, 2025 20:45 IST
Follow Us
  • Best countries to study abroad for Indians
    1/9

    परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अजूनही लाखो भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात आहे, परंतु अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा व्हिसा मिळवण्यच्या प्रक्रियेतील गुंतागुंत, विलंब आणि प्रचंड खर्च यामुळे विद्यार्थ्यी दुसरे पर्याय शोधताना दिसत आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/9

    अशा परिस्थितीत, काही देशांचे पर्याय सध्या समोर आले आहेत ज्यांची व्हिसा प्रक्रियाच सोपी नाही, तर येथे तुम्हाला दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या सुविधा देखील दिल्या जारतात. आपण अशा काही देशांची यादी पाहाणार आहोत जेथे शिक्षणासाठी व्हिसा मिळवणे तुलनेने सोपे आहे:
    (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/9

    पोलंड
    अलिकडच्या काही वर्षांत पोलंड हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक लोकप्रिय शिक्षण केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथील व्हिसा मंजुरी दर सुमारे ९५ टक्के आहे, ज्यामुळे येथे शिक्षणासाठी जाणे खूपच सोपे आहे. पोलंडमध्ये राहण्याचा खर्च कमी आहे आणि तेथील विद्यापीठे युरोपियन दर्जाचे शिक्षण देतात. तसेच, अभ्यासासोबतच अर्धवेळ नोकरीच्या चांगल्या संधी देखील येथे उपलब्ध आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 4/9

    जर्मनी
    जर्मनीतील सार्वजनिक विद्यापीठे ट्यूशन फी आकारत नाहीत, त्यामुळे येथे शिक्षण घेणे परवडणारे आहे. येथील व्हिसा मंजुरी दर ९०% पेक्षा जास्त आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात जर्मनी हा जगातील अव्वल देशांपैकी एक आहे. शिवाय, येथील विद्यार्थी वर्क परमिट घेऊन शिक्षण घेऊ शकतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 5/9

    फ्रान्स
    फ्रान्समध्ये व्हिसा मंजुरीचा दर सुमारे ८५ टक्के आहे आणि येथील सरकारने अलीकडेच भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियम शिथिल केले आहेत. फ्रान्समध्ये व्यवसाय, फॅशन, कला आणि मानव्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, फ्रान्सची संस्कृती आणि शिक्षण व्यवस्था जागतिक स्तरावर ओळखली जाते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/9

    संयुक्त अरब अमिराती (UAE)
    युएई, विशेषतः दुबई आणि अबू धाबी, शिक्षणाचे नवीन केंद्र म्हणून उदयास आले आहेत. येथे व्हिसा मंजूरीचा दर ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठा फायदा म्हणजे येथे त्यांना भारतीय संस्कृतीशी सुसंगत वातावरण मिळते. यूएई विद्यापीठे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देत आहेत आणि नोकरीच्या चांगल्या संधी देखील उपलब्ध आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/9

    फिलीपिन्स
    फिलीपिन्स हे वैद्यकीय आणि आरोग्यसेवेशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. येथे व्हिसा मंजूरीचा दर ७५ ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे. इंग्रजी शिक्षण प्रणाली, कमी खर्च आणि WHO मान्यताप्राप्त विद्यापीठे यामुळे भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हे आदर्श ठिकाण आहे. एमसीआय/एनएमसी परीक्षांची (एफएमजीई) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येथे चांगला पाठिंबा मिळतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 8/9

    आयर्लंड
    भारतीय विद्यार्थ्यांसाठी आयर्लंड हे पसंतीचे ठिकाण बनत आहे. येथील व्हिसा प्रक्रिया खूप जलद आणि पारदर्शक आहे आणि व्हिसा मंजुरीचा दर सुमारे ८५ टक्के आहे. आयटी, फार्मा आणि फायनान्स क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयर्लंड हे एक आदर्श ठिकाण आहे. तसेच, अभ्यासानंतर, एखाद्याला २ वर्षांचा अभ्यासोत्तर वर्क व्हिसा मिळतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/9

    न्यूझीलंड
    न्यूझीलंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनुकूल व्हिसा नियम आणि कामाचे अधिकार आहेत. येथील व्हिसा मंजुरी दर सुमारे ८०% आहे. न्यूझीलंडची शिक्षण व्यवस्था यूकेपासून प्रेरित आहे आणि हा देश त्याच्या सुरक्षितता, नैसर्गिक सौंदर्य आणि जीवनमानासाठी ओळखला जातो. येथे विद्यार्थी अभ्यासादरम्यान अर्धवेळ नोकरी आणि अभ्यासानंतर पूर्णवेळ नोकरी करू शकतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: 7 countries where getting a student visa is easy and education is affordable jshd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.