-
केसांची काळजी घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते कठीण देखील झाले आहे, विशेषतः जेव्हा केस तुटतात आणि केस गळतात. वाईट जीवनशैली, रासायनिक उत्पादने, पोषणाचा अभाव आणि चुकीची केसांची काळजी घेण्याची दिनचर्या यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस तुटण्यास कारणीभूत ठरतात. जर तुम्हीही या समस्यांनी त्रस्त असाल तर येथे दिलेल्या ८ सोप्या आणि प्रभावी टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
योग्य शॅम्पू निवडा
प्रत्येक वेळी शॅम्पू करताना, सल्फेट-मुक्त आणि सौम्य शॅम्पू वापरण्याची खात्री करा. अशा शाम्पूमुळे केसांचा नैसर्गिक ओलावा आणि तेल कमी होत नाही, ज्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
ओले केस सर्वात नाजूक असतात आणि ते सहज तुटतात. म्हणून, शाम्पू केल्यानंतर केसांना जोरात घासू नका किंवा लगेच विंचरू करू नका. केस हळूवारपणे पुसून घ्या आणि थोडे सुकल्यावरच विंचरा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
उशीवर सिल्क किंवा सॅटिनचे कव्हर वापरा
रात्री झोपताना कापसाच्या उशाऐवजी सिल्क किंवा सॅटिनच्या उशाचे कव्हर वापरा. यामुळे केसांमध्ये घर्षण कमी होईल आणि तुटण्याची शक्यता कमी होईल. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
नियमित केस ट्रिम करा
दर ६ ते ८ आठवड्यांनी तुमचे केस ट्रिम करा. यामुळे केसांना फाटे फुटले असतील तर निघून जातील व केस वाढतील. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
तुमचे केस व्यवस्थित विंचरा.
शाम्पू केल्यानंतर, जेव्हा तुमचे केस थोडे कोरडे होतील, तेव्हाच कंगवा वापरून विंचरा. रुंद दात असलेला कंगवा वापरा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
हीट स्टाईलिंग टाळा
ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्नचा वारंवार वापर केल्याने केस कोरडे आणि कमकुवत होतात. उष्णता स्टाइल कमीत कमी करा आणि आवश्यक असल्यास, आधी हीट प्रोटेक्शन लावा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
भरपूर पाणी प्या.
डिहायड्रेशन, म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्याचा थेट परिणाम केसांवर होतो. दररोज किमान ७-८ ग्लास पाणी प्या, जेणेकरून केसांना आतून ओलावा मिळेल आणि ते मजबूत होतील. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
संतुलित आहार घ्या
निरोगी केसांसाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. तुमच्या आहारात प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, बायोटिन, फायबर आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश करा. अंडी, सुकामेवा, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि फळे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
केसांना फाटे फुटलेत? केस खूप गळतात? ‘या’ ८ टिप्समुळे समस्या होईल दूर
Hair Fall Issues : जर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्याच्या दिनचर्येत नियमितपणे या सोप्या आणि स्मार्ट टिप्सचा समावेश केला तर हळूहळू तुम्हाला दुभंगणे आणि केस गळणे या समस्येपासून आराम मिळू शकेल.
Web Title: Daily hair care routine to avoid hair fall and split ends hrc