-
शाकाहारी लोकांचे मांस म्हणून ओळखले जाणारे फणस जर मसालेदार आणि रसाळ पद्धतीने शिजवले तर चविष्ट भाजी तयार होते. पण ही रसाळ फणसाची डिश बनवण्यापूर्वी त्याची रेसिपी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सोप्या पद्धतीने फणस कसा बनवायचा ते येथे शिका.
-
भाजी बनवण्याचे साहित्य : ५०० ग्रॅम फणस, २ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून जिरे, १ चिमूटभर हिंग, १ कांदा (चिरलेला), १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ (प्युअर केलेले) टोमॅटो, १/२ टीस्पून हळद पावडर, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून धणे पावडर, १ टीस्पून जिरे पावडर, १ टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ
-
फणसाच्या भाजीची कृती : फणस चांगले सोलून त्याचे लहान तुकडे करा. आता हे तुकडे हलक्या खारट पाण्यात १० ते १५ मिनिटे उकळवा जेणेकरून फणस मऊ होईल. एका पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यात जिरे आणि हिंग घाला. जिरे तडतडू लागले की, चिरलेला कांदा घाला आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
-
भाजीची कृती : आता आले-लसूण पेस्ट घाला आणि १-२ मिनिटे परतून घ्या. नंतर टोमॅटो प्युरी घाला आणि तेल मसाल्यांपासून वेगळे होईपर्यंत चांगले परतून घ्या. उकडलेले फणसाचे तुकडे घाला आणि मसाल्यांमध्ये चांगले मिसळा. नंतर हळद, लाल मिरची, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ घालून चांगले मिसळा.
-
फणसाच्या भाजीची कृती : आता १ ते २ कप पाणी घाला, पॅन झाकून ठेवा आणि फणस मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे शिजू द्या. फणस मऊ झाल्यावर त्यात गरम मसाले घाला आणि चांगले मिसळा. आता ते गरमागरम रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.
चविष्ट, रसरशीत फसणाची भाजी कशी बनवायची? एकदम सोपी रेसिपी जाणून घ्या!
शाकाहारी लोकांचे मांस म्हणून ओळखले जाणारे फणस जर मसालेदार आणि रसाळ पद्धतीने शिजवले तर ते खाल्ल्यानंतर सर्वांनाच बोटे चाटायला भाग पाडेल.
Web Title: Fanas jackfruit bhaji recipe in marathi sgk