• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. does glycerin eliminate bad breath know the experts opinion sap

ग्लिसरिनमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

Bad Breath: कांदा, लसूण यांच्या अधिक सेवनाने तोंडाला तीव्र वास येतो. कारण- त्यात विशिष्ट सल्फरयुक्त संयुगे असतात.

May 28, 2025 15:17 IST
Follow Us
  • glycerin eliminate bad breath
    1/9

    कांदा किंवा लसूण खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येणे ही सामान्य गोष्ट आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    कांदा, लसूण यांच्या अधिक सेवनाने तोंडाला तीव्र वास येतो. कारण- त्यात विशिष्ट सल्फरयुक्त संयुगे असतात. जेव्हा हे घटक स्वयंपाकासाठी चिरले जातात किंवा सोलले जातात तेव्हा अ‍ॅलियम हा एक प्रकारचा एंझाइम सोडला जातो. तो अमिनो अॅसिड सल्फोक्साइडसारख्या संयुगांना सल्फेनिक अॅसिडमध्ये रूपांतरित करतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    “हे अॅसिड तीव्र, तिखट वास निर्माण करण्यास मुख्यत: कारणीभूत आहे. हा वास काहींसाठी त्रासदायक असू शकतो”, असे मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ रिया देसाई म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    ग्लिसरिनमध्ये ग्लिसरॉल असते, जो रंगहीन व गंधहीन द्रव असतो आणि त्याला गोड चव असते. “ग्लिसरिन तोंडाला ओलावा देण्यास मदत करते. कारण- त्यात एक आर्द्रता देणारा घटक आहे, जो पाणी रोखू शकतो आणि त्या बदल्यात तोंड निरोगी ठेवतो. ग्लिसरिन जीवाणूंची वाढ रोखण्यास आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत करते. ग्लिसरिनवरआधारित माउथवॉश किंवा टूथपेस्ट खूप उपयुक्त ठरू शकतात,” असे देसाई म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    आर्टेमिस हॉस्पिटल गुरुग्राम येथील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. शबाना परवीन यांनी यावर भर दिला की, उपाय म्हणून ग्लिसरिनचा पाण्यात मिसळून वापर करणे इतर ज्ञात पद्धतींपेक्षा कमी पारंपरिक आहे. शुगर-फ्री गम चघळल्याने लाळ उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे तोंडातील अन्नाचे कण आणि जीवाणू काढून टाकून, तोंड स्वच्छ करण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    ग्लिसरिन असलेल्या पाण्याने गुळण्या करताना काळजी घ्यायला हवी. कारण- चुकून ग्लिसरिन गिळले गेल्यास अतिसार, पोटफुगी, गॅस व पोटदुखी यांसारख्या जठररोगसंबंधित समस्या उद्भवू शकतात. “ग्लिसरिन फायदेशीर असू शकते; परंतु ते सर्वांसाठी योग्य असू शकत नाही,” असेही देसाई यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    त्याऐवजी तीव्र वास दूर करण्यासाठी दात कमीत कमी दोन मिनिटे घासून, योग्यरीत्या साफ करावेत किंवा माउथवॉशने गुळण्या कराव्यात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    भरपूर पाणी प्यायल्याने तोंड ओलसर राहण्यासही मदत होते आणि अन्नाचे कण निघून जातात आणि त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    “जर तुम्हाला कांदे किंवा लसणामुळे होणाऱ्या आम्लयुक्त वासाचा किंवा तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल, तर ते वारंवार खाणे टाळा किंवा अजिबात खाऊ नका. तीव्र वासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडाला त्यांचा तीव्र वास येणे सामान्य आहे आणि ते गांभीर्याने घेऊ नये,” असे देसाई म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Does glycerin eliminate bad breath know the experts opinion sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.