-
आज संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी ५ जूनला साजरा होणारा हा दिवस आपल्या पृथ्वीच्या, निसर्गाच्या रक्षणासाठी आणि पर्यावरण संरक्षणाच्या जागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण संधी असते.(छायाचित्र: पेक्सेल्स)
-
जर तुम्हालाही हवा शुद्ध ठेवायची, प्रदूषणावर नियंत्रण ठेवायचं आणि पर्यावरणात थोडं योगदान द्यायचं असेल, तर आजपासूनच तुमच्या घराच्या आजूबाजूला ही सात उपयोगी झाडं लावायला सुरुवात करा. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
१) वडाचे झाड – वडाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. वडाचे झाड हे केवळ हिंदू धर्मात पूजनीय नाही, तर पर्यावरण दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर आहे.
वडाच्या झाडाला त्रिदेवांचे वास्तव्य मानले जाते. ते थंडावा देणारे आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करणारे आहे बेंझिन, ट्रायक्लोरोइथिलीन आणि इतर हानिकारक घटक हवेतून काढून टाकते,
पर्यावरण शुद्ध आणि थंड राखते. महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमेला या झाडाला पूजले जाते.(छायाचित्र: अनस्प्लॅश) -
२) पिंपळाचे झाड – पिंपळाचे झाड हे दिवस रात्र ऑक्सिजन देणारे झाड मानले जाते आणि ते कार्बन डाय ऑक्साईड वेगाने खेचून घेते. हिंदू धर्मात हे झाड पूजनीय आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
३) कडूलिबांचे झाड – आयुर्वेदात कडूलिबांच्या झाडाला खूप महत्त्व आहे. या झाडाच्या फांद्या आणि देठांचा वापर औषध बनवण्यासाठी करतात. धान्यांमध्ये कडूलिंबाची पाने टाकल्याने धान्याला कीड लागत नाही आणि ते उच्च ऑक्सिजनदेखील तयार करते. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
४) अशोकाचे झाड – उंच असणारे हे अशोकाचे झाड सावली देणारे झाड मानले जाते आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन देते. वास्तुशास्त्रात शुभ मानले जाणारे हे झाड घराभोवती लावल्यास शांती आणि समृद्धी नांदते. तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला अशोकाचे झाड नक्की लावा. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
५) पेरुचे झाड – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक हिरवं पाऊल उचलायचं ठरवलंच असेल तर पेरूचे झाड लावणं ही उत्तम निवड ठरेल!
हे झाड केवळ टवटवीत फळं देत नाही, तर भरपूर सावलीही देते. विशेष म्हणजे, हे झाड हवेतील प्रदूषण कमी करत वातावरण शुद्ध ठेवतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढवतं.
आरोग्य, हिरवळ आणि शुद्धतेसाठी. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
६) तुळस – प्रत्येक हिंदू घराचं पवित्र रक्षणकवच आणि निसर्गाचं हिरवं वरदान!”
तुळशीचं झाड केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग नाही, तर आयुर्वेदातही तिचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली ही वनस्पती अनेक आजारांपासून संरक्षण करते.
पण, फार थोड्यांना माहिती आहे की तुळस हवेतील विषारी घटक दूर करून वातावरण शुद्ध करते आणि उत्तम प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
७) एरिका पाम – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, एक असं झाड लावा जे शुद्ध हवा, सौंदर्य आणि आरोग्याचं त्रिसूत्री समाधान देतं – ते म्हणजे एरिका पाम!
हे झाड दिवसा मुबलक ऑक्सिजन सोडतं, घरातील किंवा ऑफिसमधील हवेला आर्द्रता देतं आणि प्रदूषणकारी घटक शोषून वातावरण शुद्ध करतं.
त्याचा देखणा आणि नाजूक देखावा तुमच्या घराच्या सौंदर्यातही भर घालतो. (फोटो: अनस्प्लॅश)
निसर्गाशी मैत्री करा ! जागतिक पर्यावरणदिनी भरपूर ऑक्सिजन देणारी ही सात झाडे लावा आणि शुद्ध हवेचे स्वागत करा ।
जागतिक पर्यावरण दिन २०२५, जास्त ऑक्सिजन देणारी झाडे: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, तुमच्या आजूबाजूला हे ७ झाडे लावा. ते केवळ हवा शुद्ध करत नाहीत तर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देखील सोडतात.
Web Title: Celebrate world environment day by planting these 7 high oxygen trees around you svk 05