• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. chanakya niti 10 rules for healing relationships and avoiding mistakes svk

प्रत्येक टप्प्यावर अडथळे येत असतील तर चाणक्य नीतीतील या १० अमूल्य गोष्टी लक्षात ठेवा – यशही मिळेल आणि तुटलेली नातीही पुन्हा जोडली जातील!

तुटलेले नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी चाणक्य नीती १० प्रमुख तत्त्वे: आयुष्यात तुम्ही कितीही अडथळ्यांना तोंड दिले तरी तुम्हाला यश मिळत नाही, अशा वेळी चाणक्य नीतीतील या १० गोष्टी लक्षात ठेवा.

June 6, 2025 15:20 IST
Follow Us
  • Chanakya Quotes
    1/12

    आनंद आणि दु:ख हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. माणूस आनंदात आनंदी आणि दु:खात दु:खी असतो. काही जण आपली दु:ख कोणाजवळतरी व्यक्त करतात, तर काही जणांना आपल दु:ख सांगायला नाही आवडत. काही जण त्या दु:खातून खूप पुढे जातात, तर काही जण त्या दु:खातच अडकून बसतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 2/12

    जेव्हा आयुष्यात सर्वात कठीण काळ सुरू होतो, तेव्हा अनेक जण आशा सोडतात. पण, लक्षात ठेवा अंधारानंतरच प्रकाश येतो!
    जर तुम्ही चाणक्य नीतीतील या १० अमूल्य गोष्टी मनात कोरून ठेवल्या, तर तुमचा वाईट काळ केव्हा सरून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही.
    या गोष्टी केवळ यशासाठीच नव्हेत, तर तुटलेल्या नात्यांना जोडण्यासाठी आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठीदेखील अत्यंत प्रभावी आहेत.
    प्रत्येकाने चाणक्यांची ही मौल्यवान शिकवणी नक्कीच आत्मसात केली पाहिजे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 3/12

    १. सत्य – आयुष्याचा खरा पाया
    आचार्य चाणक्य म्हणतात, “सत्य हेच या सृष्टीचं मूळ आहे.” सूर्याची तेजस्विता, वाऱ्याची दिशा, निसर्गाची प्रत्येक हालचाल हे सर्व सत्यावर आधारित आहे.
    सत्यात एवढी ताकद असते की ते अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते.
    जग कितीही बदललं, परिस्थिती कितीही कठीण झाली तरीही सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, कारण शेवटी विजय नेहमीच सत्याचाच होतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 4/12

    २. एका गोष्टीशिवाय सगळं क्षणभंगुर आहे
    आचार्य चाणक्य सांगतात की, या जगात काहीही कायमस्वरूपी नाही — लक्ष्मी चंचल आहे, श्वास येतो-जातो, नाती, यश, स्थिती सगळं बदलत राहतं.
    हे संपूर्ण जग म्हणजे एक प्रवाह आहे, जो क्षणाक्षणाला बदलतो.
    पण, या बदलत्या जगात एकच गोष्ट आहे जी अढळ आहे, ती म्हणजे धर्म.
    धर्म म्हणजे नीती, करुणा आणि सत्याचं पालन; ज्यावर उभं राहतं खरं आयुष्य.
    म्हणूनच या चंचल जगात स्थैर्य हवं असेल तर धर्माला आपल्या जीवनाचं केंद्र बनवा! (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 5/12

    ३. प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवायचं असेल तर हे शिका!
    ते म्हणतात, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि त्यानुसारच त्याच्याशी वागायला हवं :
    लोभी माणसाशी पैशाने तर
    गर्विष्ठ माणसाशी नम्रतेने,
    मूर्ख माणसाशी आदराने वागा.
    विद्वान माणसाला मात्र फक्त सत्यानेच संतुष्ट करता येतं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 6/12

    ४. यशस्वी व्हायचे असेल तर
    शहाण्या माणसाने बगळ्यासारखे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे आणि योग्य वेळ, स्थळ व क्षमतेनुसार आपले ध्येय साध्य करावे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 7/12

    ५. खरा आनंद कोणाला मिळतो?
    जो माणूस पैशांच्या व्यवहारात, ज्ञान मिळवण्यात, जेवणात आणि व्यवसायात कधी लाजत नाही, तोच खऱ्या अर्थाने आनंदी असतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 8/12

    ६. समाधानी राहायचं असेल तर…
    माणसाने नेहमी आपल्या पत्नीवर, अन्नावर आणि देवाने दिलेल्या पैशावर पूर्ण समाधान ठेवावं, यातच खरी संपत्ती दडलेली आहे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 9/12

    ७. कधीही या गोष्टींवर समाधानी होऊ नका!
    आचार्य चाणक्य सांगतात, अभ्यास, देवाचे नामस्मरण आणि दान करण्यामध्ये कधीही समाधानीपणा ठेवू नका.
    हे तीन सद्गुण सतत वाढवत राहिले पाहिजेत, कारण त्यामुळेच खऱ्या आयुष्याचा विकास होतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 10/12

    ८. आदर कोणाला मिळतो?
    ज्याच्याकडे पैसा असतो, त्याच्या सभोवती मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांची साथ असते.
    अशा माणसाला पुरुषत्वाचा मान मिळतो आणि सर्वांकडून आदरही मिळतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 11/12

    ९. देव कुठे आहे?
    जसं फुलांत सुगंध, तिळात तेल, लाकडात अग्नी, दुधात तूप आणि उसामध्ये गूळ असतो, तसंच प्रत्येक माणसाच्या आत्म्यात देवाची ओळख दडलेली असते.
    देव म्हणजे प्रत्येक जीवातील निर्मळ ऊर्जा. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 12/12

    १०. धर्म म्हणजे काय?
    धर्म म्हणजे शांतीसारखी तपश्चर्या,
    समाधानापेक्षा उंचावलेला आनंद,
    लोभापेक्षा भयंकर आजार काही नाही
    आणि दयेपेक्षा मोठा काहीही धर्म नाही.
    हेच खरं जीवनाचे सूत्र आहे. (फोटो: अनस्प्लॅश)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Chanakya niti 10 rules for healing relationships and avoiding mistakes svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.