-
कुरकुरे चाट रेसिपी – स्ट्रीट फूडप्रेमींना खास भेट!
जर तुम्हाला स्ट्रीट फूडची चव आवडत असेल आणि तुम्ही काहीतरी झटपट, चटपटीत आणि मजेदार खायला शोधत असाल, तर कुरकुरे चाट हा नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय आहे! फक्त काही मिनिटांत तयार होणारी ही कुरकुरीत आणि चविष्ट रेसिपी तुमच्या चवीलाच नव्हे, तर मूडलाही ताजातवाना करेल.. -
कुरकुरे चाट रेसिपी – चविष्टतेचा झणझणीत अनुभव!
ताजं दही, खमंग मसाले आणि कुरकुऱ्यांचा भन्नाट संगम म्हणजेच ही कुरकुरे चाट! हा नाश्ता इतका चवदार आहे की एकदा खाल्ल्यावर परत परत खावासा वाटेल. स्ट्रीट स्टाईल चव घरच्या घरी अनुभवायची असेल तर ही कुरकुरे चाट रेसिपी नक्की करून बघा. -
कुरकुरे चाट रेसिपी साहित्य : १ पॅकेट कुरकुरे, १ कप दही (गाळलेले आणि थंड केलेले), २ चमचे हिरवी चटणी (पुदिना धणे), २ चमचे गोड चिंचेची चटणी, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, १ मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १/२ चमचा चाट मसाला, १/४ चमचा काळे मीठ, धणे, १-२ चमचे लिंबाचा रस (चवीनुसार)
-
कुरकुरे चाट रेसिपी – काही मिनिटांत तयार होणारा चविष्ट झणझणीत नाश्ता!
एक मोठा वाडगा घ्या आणि त्यात कुरकुरीत कुरकुरे घाला. त्यावर ताजे, बारीक चिरलेले कांदे, टोमॅटो आणि झणझणीत हिरव्या मिरच्यांचा तडका द्या. आता त्यावर थंडगार, फेटलेलं दही ओता, जे संपूर्ण चाटला मस्त मऊ आणि ताजं स्पर्श देईल. वरून घाला हिरवी पुदिना-धण्याची चटणी आणि गोड चिंच चटणी, ज्यामुळे चव होईल भन्नाट, चटपटीत आणि मनाला भुरळ घालणारी! -
कुरकुरे चाट रेसिपी – अंतिम टच, अंतिम चव!
चविष्टतेचा धमाका वाढवण्यासाठी आता तयार मिश्रणावर चवीनुसार चाट मसाला आणि काळं मीठ शिंपडा. त्यानंतर पिळा ताज्या लिंबाचा रस.
हे सगळं हलक्या हातांनी नीट मिसळा – लक्षात ठेवा, कुरकुरे मऊ नाही तर कुरकुरीतच हवे! आता वरून भरपूर शेव आणि ताजी कोथिंबीर घालून द्या सजावटीचा सुंदर टच.
लगेच सर्व्ह करा, कारण गरमागरम, ताजं आणि कुरकुरीत कुरकुरे चाट खाण्याचा आनंद काही औरच असतो!
खमंग आणि चविष्ट! स्ट्रीट स्टाईल कुरकुरे चाट रेसिपी; घरच्या घरी बनवा कुरकुरे चाटचा धमाकेदार स्वाद!
कुरकुरे चाट रेसिपी. ताजे दही आणि मसाले आणि कुरकुरे नाश्ता खूप चविष्ट आहे. कुरकुरे स्ट्रीट स्टाइल कुरकुरे चाट रेसिपी येथे जाणून घ्या.
Web Title: Make this street style kurkure chaat recipe at home svk 05