-
विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात.
-
हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे. सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिला वटपौर्णिमेला व्रत करतात.
-
महाराष्ट्रात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो.
-
यंदा १० जून २०२५ रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल तो ११ जून रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी समाप्त होणार आहे.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात.
-
यादिवशी सुवासिनी एकमेकांना वाण देतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वाण देण्याची देण्याची प्रथा फार जुनी आहे.
-
या वाणात पाच काळ्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळ ही फळं ठेवली जातात.
-
पण अनेकांना प्रश्न पडतो की, वटपौर्णिमेच्या वाणात हीच पाच फळं का ठेवली जातात? तर यामागेही एक कारण आहे.
-
ते म्हणजे ही पाचही फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शिवाय ही हंगामी फळ आहेत. ज्यामुळे ती मोठ्याप्रमाणात वर्षभरातून एकदा खायला मिळतात.
-
त्यामुळे वाणाच्या निमित्ताने ही फळं खायला मिळतात. तसेच वाण देताना महिलांना समाधानही मिळते. (Photo – Indian express, social media)
Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेला विवाहित महिला वाणात ‘ही’ ५ फळंच का ठेवतात? काय आहे त्याचं महत्व? घ्या जाणून
Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेला विवाहित महिला वाणात पाच फळ का देतात, जाणून घेऊ कारण
Web Title: Vat purnima 2025 vrat important of 5 fruits mango karvanda java plum jackfruit vat savitri purnima vrat scientific reason in marathi sjr