-
दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात ते खाल्ल्याने शरीर थंड होते आणि पचनक्रियादेखील सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, हल्ली बाजारात पॅक केलेले दही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, जे कधीकधी खूप आंबट असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत अनेक जण मिठाईच्या दुकानातून दही खरेदी करतात, जे पॅकेट दह्याच्या तुलनेत खूप चविष्ट आणि घट्ट असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही देखील अशाप्रकारे घट्ट दही सहज तयार करू शकता, यासाठी केवळ तुम्ही खालील टिप्स फॉलो करायच्या आहेत.(फोटो सौजन्य: Freepik)
-
जास्त साय असलेले दूध वापरा: दही सेट करण्यासाठी जास्त साय असलेले दूध चांगले असते. दही बनवण्याआधी प्रथम दूध व्यवस्थित गरम करा आणि कोमट होईपर्यंत ठेवा. दूध जास्त गरम किंवा जास्त थंड राहिल्यास दही व्यवस्थित होत नाही.(फोटो सौजन्य: Freepik)
-
थोडे दही मिसळा: गरम केलेल्या दुधात एक चमचा ताजे दही घाला व व्यवस्थित मिक्स करा. जास्त दही घातल्याने दही आंबट होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
काही वेळ झाकून ठेवा: दुधात दही मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवा. तसेच, दही सेट करण्यापूर्वी भांडी निवडताना काळजी घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
फक्त स्टील, काच किंवा मातीची भांडी वापरल्याने दही गोड लागते. दही सेट करण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरू नये.(फोटो सौजन्य: Freepik)
-
सहा ते आठ तासांनंतर दही तपासा. अशा प्रकारे तुमचे दही चविष्ट आणि घट्ट होईल.(फोटो सौजन्य: Freepik)
घट्ट दही बनवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
How To Make Dahi: घरच्या घरी घट्ट दही तुम्ही सहज तयार करू शकता, यासाठी केवळ तुम्ही खालील टिप्स फॉलो करायच्या आहेत.
Web Title: Follow these tips to make thick curd sap